लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अटल आरोग्य वाहिणी अंतर्गत शनिवारी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व एकलव्य निवासी पब्लिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य सेवेसाठी चार रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सदर रूग्णवाहिकामुळे आता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तत्काळ आरोग्य सेवा मिळणार आहे.सदर लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, जि.प. सदस्य रंजिता कोडापे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाने अटल आरोग्य वाहिणी योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना उत्तम व तत्काळ आरोग्य सेवा देण्यासाठी पहिल्यांदाच रूग्णवाहिका पुरविल्या आहेत. गडचिरोली प्रकल्पाला चार रूग्णवाहिका प्राप्त झाल्या. गडचिरोली प्रकल्पातील गडचिरोली, मार्र्कंडादेव, मुरूमगाव, रामगड या चार आश्रमशाळेत या रूग्णवाहिका राहणार असून प्रत्येक रूग्णवाहिका कार्यक्षेत्रातील पाच ते सहा शासकीय आश्रमशाळेतील तसेच संबंधित एकलव्य निवासी पब्लिक शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा देणार आहे. सदर रूग्णवाहिका आवश्यक व अत्याधुनिक उपकरणाने सज्ज असून प्रत्येक रूग्णवाहिकेत एक डॉक्टर व दोन पायलटचा समावेश राहणार आहे. आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित तपासणी सुध्दा या रूग्णवाहिकेच्या माध्यमातून होणार आहे.
आश्रमशाळेतच मिळणार आरोग्यसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:06 IST
स्थानिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अटल आरोग्य वाहिणी अंतर्गत शनिवारी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते गडचिरोली प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा व एकलव्य निवासी पब्लिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य सेवेसाठी चार रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
आश्रमशाळेतच मिळणार आरोग्यसेवा
ठळक मुद्देविद्यार्थ्यांसाठी चार रूग्णवाहिका उपलब्ध : पालकमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण