शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

गोपनार येथे आरोग्य केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM

प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलींद सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी रुग्णालयाचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, साहित्यिक व ज्येष्ठ कार्यकर्ते विलास मनोहर, रेणुका मनोहर, डॉ.निलोफर बिजली आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देदुर्गम भागातील नागरिकांना मिळणार सेवा : लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या गोपनार गावात लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील गावांमधील नागरिकांना आरोग्याची सुविधा पुरविली जाणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिलींद सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका डॉ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी रुग्णालयाचे संचालक डॉ.दिगंत आमटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनघा आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, साहित्यिक व ज्येष्ठ कार्यकर्ते विलास मनोहर, रेणुका मनोहर, डॉ.निलोफर बिजली आदी उपस्थित होते.गोपनार गावाच्या सभोवताल होडरी, लष्कर, आलदंडी, मोरडपार, धिरंगी ही आदिवासीबहुल गावे आहेत. या भागात आरोग्याच्या सुविधा नाहीत. लाहेरी, भामरागड या ठिकाणी शासकीय रुग्णालय आहेत. मात्र ही दोन्ही गावे गोपनारपासून बरेच दूर आहेत. एखाद्या रुग्णावर वेळेवर प्राथमिक उपचार न झाल्यास त्याच्या जीवास धोका राहते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. दुर्गम भागातील नागरिकांना सुविधा मिळावी, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आले.दवाखान्यासाठी पक्की सिमेंटची इमारत व रुग्णांसाठी शेड उभारला जाणार आहे. सदर केंद्र नियमित सुरू ठेवले जाईल व नागरिकांना विनामूल्य सेवा दिली जाईल. औषधीही दिली जाईल. उद्घाटनाच्या वेळी जगदीश बुरडकर, शारदा ओक्सा, गणेश हिवरकर, अशोक गायकवाड, प्रकाश मायरकर, दीपक सुतार, संध्या येम्पलवार, बिरजू दुर्वा हजर होते.दुर्गम भागातील नागरिक भारावलेलोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने भामरागड तालुक्यातील गोपनार येथे आरोग्य केंद्र सुरू केले आहे. सदर गाव अतिशय दुर्गम भागात वसले आहे. प्राथमिक उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू होताना येथील नागरिकांनी बघितले आहे. मात्र वाहतुकीची साधने नसल्याने त्यांच्यासमोर काहीच पर्याय नव्हता. मात्र लोकबिरादरी प्रकल्पाने गोपनारसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. परिसरातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दुर्गम भागातील नागरिक उपस्थित होते. आरोग्य सुविधा मिळणार असल्याने नागरिक भारावले.

टॅग्स :Healthआरोग्य