आरोग्य केंद्राची इमारत जीर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:42+5:30
झिंगानूर आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून या इमारतींपासून केव्हाही धोका होऊ शकतो. झिंगानूर गावातील नागरिक, कर्मचारी व दुकानदारांनी मिळून आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या स्वरूपाचे शेड बांधकाम केले. जुनी इमारत पूर्णत: धोकादायक बनली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. मात्र दखल घेण्यात आली नाही.

आरोग्य केंद्राची इमारत जीर्णावस्थेत
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत आहेत. याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. यामध्ये आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या जीर्ण इमारती, वैैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, विविध सोयीसुविधांचा अभाव आदींचा समावेश आहे. झिंगानूर आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून या इमारतींपासून केव्हाही धोका होऊ शकतो.
झिंगानूर गावातील नागरिक, कर्मचारी व दुकानदारांनी मिळून आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या स्वरूपाचे शेड बांधकाम केले. जुनी इमारत पूर्णत: धोकादायक बनली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. मात्र दखल घेण्यात आली नाही.
झिंगानूर परिसरातील २० ते २५ गावांमध्ये हे आरोग्य केंद्र वगळता आरोग्याच्या कोणत्याही सोयीसुविधा नाही. खासगी आरोग्य सेवाही तोकडी आहे. शिवाय या भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते मोठ्या शहरात येऊन औषधोपचार करू शकत नाही. लोकप्रतिनिधी व जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर तसेच इतर ठिकाणच्या आरोग्य व उपकेंद्रांना भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या नाही, असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.
एकूणच अहेरी उपविभागाच्या पाचही तालुक्यात शासकीय आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली असून या भागातील रूग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.
लोहा, कल्लेड गाव विजेपासून वंचित
भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या कोजेड ग्राम पंचायतींतर्गत येणाºया लोहा, कल्लेड येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. सदर दोन्ही गावातील नागरिकांना रात्रीच्या सुमारास अंधाराचा सामना करावा लागतो. विद्युत पुरवठ्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तीन ते चारदा महावितरणच्या अधिकाºयांना निवेदन दिले. मात्र कार्यवाही करण्यात आली नाही.