वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा
By Admin | Updated: September 11, 2014 23:32 IST2014-09-11T23:32:50+5:302014-09-11T23:32:50+5:30
आजच्या वैज्ञानिक युगात सतत नवनवे संशोधन होत आहेत. त्यांचा फायदा मानवाच्या विकासासाठी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज आहे. गडचिरोलीसारख्या

वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा
गडचिरोली : आजच्या वैज्ञानिक युगात सतत नवनवे संशोधन होत आहेत. त्यांचा फायदा मानवाच्या विकासासाठी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे प्रतिपादन शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. खोब्रागडे यांनी केले.
येथील पदव्युत्तर रसायनशास्त्र मंडळाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रा. एन. जे. सिद्धीकी, डॉ. एन. एन. करडे, डॉ. एम. आय. इद्रिस, प्रा. पी. डी. अष्टपूत्रे, डॉ. एस. नारखेडे, डॉ. वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रसायनशास्त्र मंडळाच्या कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून संजोग आभारे, उपाध्यक्ष गिरिश घोरमोडे, सचिव अनुराधा कोरडे, कोषाध्यक्ष प्रियंका नंदरधने, सरसचिव राबाफरहिन सय्यद, प्रा. एन. जे. सिद्धीकी यांची निवड करण्यात आली. याच कार्यक्रमादरम्यान संजोग आभारे, अश्विनी अलोणे, संजय गेडाम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात डॉ. एन. एन. करडे यांनी आॅरगॅनिक रिएजेटस याविषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या टप्प्यात एमएस्सी भाग २ व १ च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अधिर इंगोले यांची मिस्टर फ्रेशर व अश्विनी नरड हिची मिस फ्रेशर म्हणून म्हणून निवड करण्यात आली. संचालन चैताली वसाके, तुषार नेदनूरवार तर आभार सुप्रिया मजुमदार, विनायक दोडके यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)