चिखलमय रस्त्याने वाट अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:18+5:30
रस्त्याने गटार लाईनसाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेला रस्ता कंत्राटदाराने व्यवस्थित बुजविला नाही. त्यामुळे खोलगट भाग निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मागणीनंतर नगर परिषदेने या ठिकाणी मुरूम टाकला आहे. या मुरूमावर आता चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

चिखलमय रस्त्याने वाट अवघड
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील वीर बाबुराव शेडमाके चौकाच्या मागील बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याने गटार लाईनसाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेला रस्ता कंत्राटदाराने व्यवस्थित बुजविला नाही. त्यामुळे खोलगट भाग निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मागणीनंतर नगर परिषदेने या ठिकाणी मुरूम टाकला आहे. या मुरूमावर आता चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.
या मार्गावर ज्या ठिकाणी चिखल निर्माण झाले आहे. त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नगर परिषदेने काळी गिट्टी किंवा गिट्टीचा चुरा टाकावा जेणेकरून चिखल होणार नाही. नगर परिषदेमार्फत टाकल्या जात असल्या मुरूमामुळे चिखलाची समस्या शहरात अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेने मुरूमाऐवजी गिट्टीचा चुरा टाकणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणचा मार्ग गटारलाईन कंत्राटदाराने व्यवस्थित दुरूस्त करून द्यावा, अशी मागणी होत आहे.