पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:42 AM2019-09-17T00:42:54+5:302019-09-17T00:43:17+5:30

दीड महिना झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्याला पुराचा जोरदार फटका बसला. अनेक नागरिकांचे कुटुंब पुरामुळे असहाय झाले. मदतीच्या आवाहनानंतर जिल्हाभरातून तसेच बाहेरून अनेक जणांचे मदतीसाठी हात सरसावले. पैैशांसह दैैनंदिन गरजेच्या वस्तू नागरिकांनी भामरागडच्या पूरग्रस्तांना पाठविले.

Hands stretched out to help flood victims | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हात

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हात

Next
ठळक मुद्देअनेक ठिकाणाहून मदत : भामरागड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोहोचविल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दीड महिना झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्याला पुराचा जोरदार फटका बसला. अनेक नागरिकांचे कुटुंब पुरामुळे असहाय झाले. मदतीच्या आवाहनानंतर जिल्हाभरातून तसेच बाहेरून अनेक जणांचे मदतीसाठी हात सरसावले. पैैशांसह दैैनंदिन गरजेच्या वस्तू नागरिकांनी भामरागडच्या पूरग्रस्तांना पाठविले.
भामरागड - तालुक्यातील गुंडरवाही, कोरपर्सी, पोयरकोठी, मिरगुडवंचा येथील पूरग्रस्तांना दैैनंदिन गरजेच्या वस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी तहसीलदार कैैलास अंडिल, नायब तहसीलदार निखिल सोनवाने उपस्थित होते. तांदूळ, कपडे व अन्य वस्तूंचे वितरण करण्यात आले.
भामरागड तालुका मुख्यालयापासून २७ किमी अंरावरील अतिदुर्गम मरकनार गाव पुराच्या विळख्यात सापडून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना लोकबिरादरी प्रकल्पाकडून मदत देण्यात आली. ६ व ७ सप्टेंबरला भामरागडसहित तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. मरकनार या ४० कुटुंबाच्या आदिवासी गावातही पुराचे पाणी शिरले. येथील काही भागात ७ ते ८ फूट पाणी होते. लोकांच्या अन्नधान्यासहीत कपडे सुद्धा वाहून गेले. पुरामळे तारांबळ उडाली, घरे कोसळली, कोंबड्या, बकऱ्या, डुक्करे, जनावरांना जलसमाधी मिळाली. लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ही बाब लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांना समजताच तातडीने मरकनार गावी कार्यकर्ते घेऊन स्वत: नाल्यावरुन होडीने सामान घेऊन मदत पोहोचविली. धान्य, भांडी, चादर, ब्लँकेट, शाल, टी-शर्ट, साडी अशा जीवनावश्यक वस्तू तेथील आदिवासी बांधवांना वितरीत केल्या. यासाठी प्रकल्पातील कार्यकर्ते सचिन मुक्कावार, केतन फडणीस, राहुल भसारकर यांनी सहकार्य केले.
तालुक्यातील पुरबाधित गावातील नुकसानग्रस्तांना शुक्रवारी डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर व आर्य वेश्य कोमटी समाज गडचिरोलीतर्फे ७०० मदत किटचे वाटप व आरोग्य तपासणी व औषध वितरण करण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळ, तेल, तिखट, मीठ आदींचा समावेश आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी ७०० मदत किट भामरागड, कृष्णार, आरेवाडा, कारमपल्ली, फुलणार, मिरगुडवंचा, पोयरकोठी, गुंडेसुर, हिणभट्टी, कोरपरसी, गुंडूरवाही, गुंडेनूर, जुवी, हलवेर, कियर, पल्ली आदी गावातील नुकसानग्रस्तांना देण्यात आली. यासोबतच ताडगाव, कारंमपल्ली, हिंदूर या गावात चंद्रपूरच्या शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. प्रवीण येरमे, डॉ. निखिल भागवत, डॉ. के. एल. रॉय यांनी २५० रुग्णांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप केले. या सर्व कार्यक्रमात डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूरचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अहेरी, आलापल्ली व भामरागड येथील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
गडचिरोली - महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा संचालित त्रिवेणी संगम लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने पूरग्रस्तांना विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच तीन दिवस महिलांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्त नागरिकांना भोजनदान केले. यावेळी व्यवस्थापिका अंजली दोंतुल, रूख्मिनी भलावी, देविका पुंगाटी व महिलांचे सहकार्य लाभले.
फ्युचर विंग्स या संस्थेच्या वतीने भामरागड येथील पूरग्रस्त जवळपास १५० नागरिकांना विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. वितरित वस्तूंमध्ये तेल, डाळ, बिस्कीट आदींचे वितरण करण्यात आले. यावेळी फ्युचर विंग्सचे प्रमुख सचिन मडावी, संजय निमगडे, नानाजी मडावी, वैभव सुधाशिव, नीतेश वेस्कडे, तेशांत वाचामी, अर्जुन अलाम, सोर्इंद्र मडावी आदी उपस्थित होते.
घोट - घोट गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया निकतवाडा नवेगाव येथील शालेय विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी व साहित्य गोळा केले. घोट येथील नवोदय उच्च प्राथमिक शाळा, महात्मा गांधी हायस्कूल, जि. प. महात्मा गांधी हायस्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक, गावातील नागरिक सहभागी झाले. याप्रसंगी भारत स्वाभिमान न्यास गडचिरोलीचे अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, उमाजी कुद्रपवार, घोट पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मिठू जगदाळे, जे. बी. गेडाम, पोलीस पाटील अविनाश वडेट्टीवार, विलास गण्यारपवार, अतुल येनगंटीवार, प्राचार्य मनोज नागोसे, श्रीकांत शिंदे, सुनील गोवर्धन, गणेश मडावी, हेमंत उपाध्ये, पी. के. कांबळे, उपसरपंच साईनाथ नेवारे, सीताराम बारसागडे, हरिचंद्र सोनटक्के, सदाशिव दुधकोहळे, राजू बारसागडे, रघुनाथ सरवर, रमेश सोनटक्के, संतोष बैलावार उपस्थित होते. सर्वप्रथम जनजागृतीसाठी रॅली काढून गावातील मुख्य मार्गावरून फिरविण्यात आली.
एटापल्ली - येथील पंचायत समितीच्या वतीने पूरग्रस्तांसाठी १०० ताडपत्र्यांची मदत तहसीलदार कैलास अंडिल यांना सुपूर्द करण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे येथून प्राप्त झालेले कपडे व अन्य साहित्य वितरणासाठी सुपूर्द करण्यात आले. यावेळी पं. स. सभापती बेबी लेखामी, उपसभापती नीतेश नरोटे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण नरोटे उपस्थित होते.
अहेरी - गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूरच्या वतीने भामरागड येथील पूरपीडितांना जीवनावश्यक वस्तू, कपडे, तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, खाद्यतेल, व स्वयंपाकाला लागणारे इतर आवश्यक वस्तू प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. यावेळी बिच्चू वड्डे, शिवाजी कुंजामी, सुकदेव वाचामी, मुकेश मडावी, सगनी कुंजामी, चंदा वड्डे, सुधाकर कन्नाके, विजयराव तोडासे, ज्योतीराव गावडे, रमेश कुंभरे, गुणाकार जुमनाके, सुरेश टेकाम, बापूजी मडावी उपस्थित होते.
आरमोरी - शहराच्या विविध भागांमधून आर्थिक मदत तसेच अन्नधान्य, भांडी, कपडे तसेच अन्य साहित्य गोळा करण्यात आल्या. सदर वस्तू भामरागड येथील पूर पीडितांना पाठविण्यात आल्या. नवदुर्गा उत्सव मंडळ जुना बसस्टंँड आरमोरी यांच्या कडून पूरपीडितांसाठी ५००१ रूपयांचा निधी प्राप्त झाला. यातून ५० ब्लँकेट खरेदी करण्यात आले. पटेल चौक आरमोरी भागातून ७ किट गोळा करण्यात आल्या. तसेच ४०० रूपये मदतनिधी गोळा झाला. यातून हळद, तिखट, मिठाचे पँकेट घेण्यात आले. शक्तीनगरातून ५५०० रूपयांची आर्थिक मदत गोळा करण्यात आली. यातून किराणा खरेदी करून पूरग्रस्तांसाठी पाठवण्यात आला. लक्ष्मीवसाहत भागातून ४५०० रूपयांची आर्थिक मदत मिळाली. यातून किराणा खरेदी करण्यात आला तसेच जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात आल्या. पेट्रोल पंप मागच्या भागातून जीवनावश्यक वस्तूच्या ७ किट गोळा झाल्या. शास्त्रीनगरातून जीवनावश्यक वस्तू च्या ५ किट गोळा झाल्या. कुरखेडा विभागातून ५० किलो तांदूळ, भांडी, दोन जीवनावश्यक वस्तूंच्या किट तसेच नान्ही शाळा कुरखेडा यांच्याकडून ४०० रूपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली. पोलीस स्टेशनचा मागील भाग तसेच इतर विभागातून १८०० रूपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली. तसेच जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंच्या १७ किट गोळा करण्यात आल्या. १८० किलो तांदूळ, डाळी, इतर कडधान्ये, बिस्किटे, चप्पल तसेच इतर किरकोळ वस्तू भामरागडला पाठवण्यात आल्या.
महाराष्ट्र साडी सेंटरचे अशोक ठकरानी यांच्याकडून ३५ नवीन शर्ट पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवण्यात आली. पूर पीडितांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या लोकमत सखी मंच सदस्यांचे सहकार्य लाभले. तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी साहित्य पाठवण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली. भामरागडकडे रवाना झालेल्या वाहनाला सुनीता तागवान यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी पोलीस शहीद समितीच्या अध्यक्ष हेमलता वाघाडे, भाजपा महिला आघाडीच्या डॉ. संगिता रेवतकर, रत्ना बोरकर, अर्चना ढोबळे, विद्या चौधरी, आशा शेडमाके, छाया गजभिये, नीकिता सराटे, मेहमुना भुर्रा, भावना बारसागडे, प्रेमिता मधे, अश्विनी गजपुरे, मनिषा हेमके, डॉली बारसागडे, स्मिता धकाते, मनिषा मने, सिंधूताई कापकर उपस्थित होत्या.
आष्टी - येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयाच्या वतीने भामरागड तालुक्यातील कोठी येथे पूर पीडितांना वस्तू व मदत निधीचे वितरण करण्यात आले. आष्टी येथील नागरिक तसेच व्यावसायिकांकडून नोटबूक, कपडे, अन्नधान्य, तांदूळ, डाळ व अन्य साहित्य प्रा. डॉ. भारत पांडे, प्रा. डॉ. गणेश खुणे यांनी प्राचार्य संजय फुलझेले यांच्या नेतृत्त्वात गोळा केले. त्यानंतर सदर साहित्य कोठी येथे वितरित करण्यात आले. याप्रसंगी सरपंच भाग्यश्री लेकामी, परिचारिका निता मेश्राम, ग्रामसेवक डी. के. अंबादे, रामजी हेडो तसेच प्रा. डॉ. रवी शास्त्रकार, प्रा. डॉ. आर. आर. तुला, प्रा. डॉ. राज मुसने, प्रा. श्याम कोरडे, प्रा. ज्योती बोबाटे, प्रा. भाऊराव सालूरकर, गीता गभणे, राजू लखमापुरे, नीलेश नाकाडे, श्रीनिवास गोर्ला, संतोष बारापात्रे, मो. मुस्ताक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Hands stretched out to help flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.