निम्मे फुटपाथ विक्रेते कर्जाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:37 IST2021-03-31T04:37:36+5:302021-03-31T04:37:36+5:30

लाॅकडाऊनच्या कालावधीत जवळपास तीन महिने दुकाने बंद असल्याने त्यांची आर्थिक स्थिती ढासळली. केंद्र शासनाने २४ मार्च २०२० पासून पथविक्रेता ...

Half the sidewalk vendors are waiting for a loan | निम्मे फुटपाथ विक्रेते कर्जाच्या प्रतीक्षेत

निम्मे फुटपाथ विक्रेते कर्जाच्या प्रतीक्षेत

लाॅकडाऊनच्या कालावधीत जवळपास तीन महिने दुकाने बंद असल्याने त्यांची आर्थिक स्थिती ढासळली. केंद्र शासनाने २४ मार्च २०२० पासून पथविक्रेता आत्मनिर्भर याेजना सुरू केली. या याेजनेंतर्गत १० हजार रूपयांचे भांडवली कर्ज बॅंकेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचे आहे. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी भागातील चहा, नाश्ता, हाॅटेल, चप्पल विक्रेते, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, सायकल स्टाेअर्स, डेली निड्सचे दुकान असलेल्या १ हजार १५१ लाभार्थ्यांनी नगरपंचायत व नगर परिषदेच्या मार्फत बॅंकांकडे अर्ज सादर केेले. त्यापैकी ७२३ अर्ज मंजूर करण्यात आले. व प्रत्यक्षात ५८५ लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण झाले आहे. निम्मे अर्ज बॅंकांच्या लेटलतीफ धाेरणामुळे अडून आहेत.

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी याेजनेंतर्गत केवळ १० हजार रुपयांचे भांडवली कर्ज दिले जात आहे. वाढत्या महागाईचा विचार केल्यास व्यवसाय उभारण्यासाठी दहा हजार रुपये अतिशय कमी भांडवल झाले. यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. कर्ज कमी मात्र त्यासाठी लागणारे कागदपत्रे जास्त असल्याने अनेकांनी कर्ज घेण्यासही नकार दिला आहे.

Web Title: Half the sidewalk vendors are waiting for a loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.