शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहरात निम्मे मोबाईल टॉवर अवैध

By admin | Updated: September 21, 2014 23:50 IST

मोबाईल क्रांतीचा आर्थिक फायदा उचलण्यासाठी विविध कंपन्यांनी शहरात १४ मोबाईल टॉवर उभारले आहेत. यातील सुमारे सात मोबाईल टॉवर अवैध इमारतींवर उभारण्यात आले असल्याने सदर

दिगांबर जवादे - गडचिरोलीमोबाईल क्रांतीचा आर्थिक फायदा उचलण्यासाठी विविध कंपन्यांनी शहरात १४ मोबाईल टॉवर उभारले आहेत. यातील सुमारे सात मोबाईल टॉवर अवैध इमारतींवर उभारण्यात आले असल्याने सदर टॉवरसुद्धा नगर परिषद प्रशासनाने अवैध ठरविले आहेत. सदर टॉवर हटविण्याविषयी नगर परिषद प्रशासनाने आजपर्यंत कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे सदर मोबाईल टॉवर अजूनही राजरोसपणे उभेच आहेत. मोबाईल ही चैनेची वस्तू नाही तर बदलत्या काळाची गरज निर्माण झाली आहे. हे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर व्यक्तीतेवढे मोबाईल हे समिकरण पुढे आले आहे. सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मोबाईल उद्योग समोर आला आहे. मोबाईल निर्मिती करण्याबरोबरच नागरिकांना मोबाईलची सेवा देण्यासाठी शासकीय कंपन्यांसह खासगी कंपन्यांमध्ये फार मोठी स्पर्धा आहे. विशेष करून सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये अधिक स्पर्धा असल्याचे दिसून येते. जी कंपनी सर्वात स्वस्त व चांगली सेवा देईल त्या कंपनीकडे सर्वाधिक ग्राहक आकर्षित होतात. शहरात मोबाईलधारकांची संख्या सर्वाधिक राहत असल्याने मोबाईल कंपन्या शहरात टॉवर उभारण्यावर भर देतात. गडचिरोली शहरात बीएसएनएल या शासकीय कंपनीसह वोडाफोन, आयडीया, रिलायंन्स, एटरटेल या कंपन्यांनी सुमारे १४ टॉवर उभारले आहेत. नगर परिषद क्षेत्रात टॉवर उभारण्यापूर्वी नगर परिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र काही खासगी कंपन्यांनी अतिक्रमणात असलेल्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारले आहे. अतिक्रमात असलेली इमारत अवैध असल्याने सदर इमारतीस नगर परिषद प्रशासन अवैध बांधकाम म्हणून घोषित करते. अशा प्रकारच्या इमारतींवर सुमारे ७ टॉवर उभारण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे शहरात असलेल्या एकुण १४ टॉवरपैकी ७ टॉवर म्हणजेच निम्मे टॉवर अवैध आहेत. तरीही नगर परिषद प्रशासन मागील अनेक वर्षांपासून केवळ बघ्याची भूमिका बजावित आहे. अतिक्रमणात असलेल्या इमारतींचे भाडे कमी राहते. त्याचबरोबर सदर इमारतींवर बांधण्यात आलेल्या टॉवरला नगर परिषद प्रशासन मंजुरी देत नाही. त्यामुळे मंजुरीचा जवळपास ५० हजार रूपयांपर्यंतचा कंपनीचा खर्च वाचतो. मंजुरी नसली तरी नगर परिषद प्रशासन मात्र कारवाई करीत नसल्याने कंपन्यांची हिंमत आणखी वाढत चालली आहे. कारवाई होत नसल्याने यानंतरचे टॉवर अशा अवैध इमारतींवरच यापुढे उभारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या महिन्याला कोट्यवधी रूपये कमवितात. त्याचबरोबर मोबाईल टॉवरचे अनेक धोके आहेत. त्यामुळे नगर परिषदेची परवानगी नसलेले मोबाईल टॉवर हटविण्यात यावे, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. मात्र या टॉवरवर कारवाई केली जात नसल्याने नागरिकसुद्धा आश्चर्यचकीत झाले आहेत. नगर परिषद प्रशासन व कंपन्यांमध्ये साटेलोटे असण्याची शक्यतासुद्धा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. एखादेवेळी या टॉवरमुळे मोठी दुर्घटना घडल्यास मोबाईल कंपन्या हातवर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर टॉवरवर नगर परिषद प्रशासनाने कारवाई करावी.