शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी हेलपाटे सुरूच

By admin | Updated: July 11, 2017 00:35 IST

प्रत्येक बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी अजूनपर्यंत कर्ज वाटपाची गती अतिशय धिमीच असून ...

केवळ २१ टक्के उद्दिष्ट साध्य : ४० कोटींचे कर्ज वितरणलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रत्येक बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी अजूनपर्यंत कर्ज वाटपाची गती अतिशय धिमीच असून जून अखेरपर्यंत उद्दिष्टाच्या केवळ २१ टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. कित्येक शेतकरी शेतीची कामे सोडून कर्जासाठी बँकांचे हेलपाटे मारीत असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बेताची राहत असल्याने शेती करण्यासाठी कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय राहत नाही. सावकार व बचतगट सुमारे ३६ ते ६० टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारतात. सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करणे सक्तीचे केले आहे. प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सुद्धा ठरवून देण्यात आले आहे. मात्र शेतकरीवर्ग कर्ज परत करीत नाही, अशी चुकीची मानसिकता बँकांच्या अधिकाऱ्यांची झाली असल्याने राष्ट्रीयकृत बँका कर्ज वितरणास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र दिसून येते. दरवर्षीप्रमाणेच याचा प्रत्यय यावर्षीसुद्धा येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे पऱ्हे पेरणीयोग्य झाले आहेत व सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी रोवणीची कामे सुरू केली आहेत. रोवणीच्या कामासासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासत असल्याने शेतकऱ्यांनी बँकांकडे कर्जाची मागणी केली आहे. मात्र बँकांनी विविध कारणे सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा अनुभव आहे. चालू खरीप हंगामात जिल्हाभरातून सर्वच बँकांना १९४ कोटी ६२ लाख रूपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र आता ३० जूनपर्यंत केवळ ३९ कोटी ९७ लाख रूपयांची कर्ज वितरित झाले आहे. ९ हजार ८४४ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे धान रोवणीसाठी पैसे नाही. त्यामुळे सदर शेतकरी बँकांसह सावकाराकडेही कर्जाची मागणी करीत असल्याचे दिसून येत आहे. सातबारा कोरा झालेल्यांना कर्ज नाहीचसातबारा कोरा झाला नंतर संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित बँकांना शासनाने दिले आहेत. मात्र बँकांनी या शेतकऱ्यांना तर अजूनपर्यंत एकही रूपयाचे कर्ज दिले नाही. सदर शेतकऱ्याचा सातबारा तर कोरा झाला. मात्र पैशासाठी अजुनही वनवनच भटकावे लागत आहे. विविध कारणे सांगून राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत.