जिमलगट्टा ग्राम पंचायत मालमाल

By Admin | Updated: March 20, 2017 01:34 IST2017-03-20T01:34:18+5:302017-03-20T01:34:18+5:30

ग्राम पंचायत जिमलगट्टा येथे पेसा अंतर्गत तेंदू लिलाव प्रक्रिया शनिवारी कार्यालयात पार पडली.

Gymlagatta Gram Panchayat Ammal | जिमलगट्टा ग्राम पंचायत मालमाल

जिमलगट्टा ग्राम पंचायत मालमाल

तेंदू लिलाव : १ कोटी ९२ लाख रूपये मिळाले
जिमलगट्टा : ग्राम पंचायत जिमलगट्टा येथे पेसा अंतर्गत तेंदू लिलाव प्रक्रिया शनिवारी कार्यालयात पार पडली. ग्राम पंचायत अंतर्गत १ हजार ११७ गोणीचे टारगेट ठेवण्यात आले होते. या प्रसंगी १ कोटी ९२ लाख १२ हजार ४०० रूपये मिळाल्याने जिमलगट्टा ग्राम पंचायत मालामाल झाली आहे.
लिलाव प्रक्रियेत तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आदी राज्यातील १४ कंत्राटदारांनी भाग घेतला होता. जिलाव प्रक्रियेत कंत्राटदार बापू रेड्डी यांनी सर्वाधिक १७ हजार २०० प्रति गोणी बोलणी केल्याने १ कोटी ९२ लाख १२ हजार ४०० रूपयांत लिलाव प्रक्रिया संपुष्ठात आली. प्रथमच एवढी मोठी बोली या प्रक्रियेत लावण्यात आली. यावर्षी जिमलगट्टा ग्राम पंचायत अंतर्गत तेंदू मजुरांना प्रति पुढा १७ रूपये बोनस मिळणार आहे. त्यामुळे येथील तेंदू संकलन करणाऱ्या मजुरांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Gymlagatta Gram Panchayat Ammal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.