गुरूपल्ली ग्रामपंचायतीची सत्ता ‘आविसं’ने पटकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:08 IST2021-02-18T05:08:07+5:302021-02-18T05:08:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत गुरूपल्ली ग्रामपंचायतीवर तब्बल १० वर्षानंतर आदिवासी विद्यार्थी संघाने आपले वर्चस्व ...

गुरूपल्ली ग्रामपंचायतीची सत्ता ‘आविसं’ने पटकावली
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत गुरूपल्ली ग्रामपंचायतीवर तब्बल १० वर्षानंतर आदिवासी विद्यार्थी संघाने आपले वर्चस्व निर्माण केले. यामध्ये सरपंचपदी उसेंडी कैलास रैनू तर उपसरपंच म्हणून आत्राम बाळू घिस्सू यांची निवड करण्यात आली. मंगळवारी तालुक्यातील साेहेगाव, उडेरा, गुरूपल्ली, येमली, कांदाेळी, वाघेझरी या सहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवडणूक पार पडली. दहा वर्षापासून गुरूपल्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता हाेती. आता या ग्रामपंचायतीवर ‘आविसं’ने आपला झेंडा फडकवल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसला झटका बसला आहे. उडेरा ग्रामपंचायतीवर ‘आविसं’ची सत्ता आल्याचा दावा आविसंचे पदाधिकारी प्रज्ज्वल नागुलवार यांनी केला आहे. येमली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने दावा केला आहे. साेहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून देहारी जग्गू बालूजी यांची तर उपसरपंचपदी राधिका नारिकराव पवार यांची निवड करण्यात आली. उडेरा ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून गाेटा गणेश चुकलू यांची तर उपसरपंचपदी गावडे बापू मुन्शी यांची निवड करण्यात आली. गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उसेंडी कैलास रैनू यांची तर उपसरपंचपदी बाळू घिस्सू आत्राम यांची निवड करण्यात आली. येमली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ललिता दुलसा मडावी तर उपसरपंचपदी पल्लवी विजय खाेब्रागडे यांची निवड करण्यात आली. कांदाेळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मडावी झुरू मासा यांची तर उपसरपंच म्हणून मडावी जिन्नी विजा यांची निवड करण्यात आली. वाघेझरी ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून काेंदामी विलास मनकू यांची तर उपसरपंचपदी वनिता वामन शेंडे यांची निवड करण्यात आली.