गुरू अर्जुनदेव यांचा शहीद दिन साजरा

By Admin | Updated: June 2, 2014 01:15 IST2014-06-02T01:15:37+5:302014-06-02T01:15:37+5:30

येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ क्रमांकाच्या बटालियनतर्फे ...

Guru Arjun Dev celebrates martyrdom day | गुरू अर्जुनदेव यांचा शहीद दिन साजरा

गुरू अर्जुनदेव यांचा शहीद दिन साजरा

अहेरी : येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ क्रमांकाच्या बटालियनतर्फे गुरू अर्जुनदेव साहेब यांचा शहीद दिन साजरा केला. यानिमित्त वाटसरूंना थंड गुलाबजलाच्या सरबताचे वितरण केले.

अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाच्या जवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाची ३७ क्रमांकाची बटालियन कार्यरत आहे. येथील सर्व जवानांच्यावतीने o्री गुरू अर्जुनदेव साहेब यांचा शहीद दिन साजरा केला. यावेळी कमांडन्ट अरूण कुमार मिना, सहायक कमांडन्ट उमेश यादव, लक्ष्मीचंद मिना, मंगेश पडीयाल, महेंद्रसिंग सुरेश भाडीया आदी उपस्थित होते. सीआरपीएफ बटालियनमध्ये विविध धर्माचे, अनेक जातींचे व विविध राज्यातील शेकडो जवान आहेत. या जवानांच्या मार्फतीने वर्षभर विविध धर्माचे मुख्य सण साजरे करतात. यामुळे जवानांमध्ये सलोख्याचे वातवरण निर्माण होण्यास मदत होते. o्री गुरू अर्जुनदेव साहेब यांच्या शहीद दिनानिमित्त सीआरपीएफ बटालियनतर्फे सरबतचे वितरण करण्यात आले.

सीआरपीएफचे जवान स्वत:च्या कुटुंबापासून शेकडो मैल दोन ते तीन महिने दूर राहतात. त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात काम करावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबाची आठवण येऊ नये, बटालियन हेच एक कुटुंब वाटावे यासाठी बटालियन प्रमुखांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याला अहेरी येथील नागरिकसुध्दा सकारात्मक उद्देशाने सहकार्य करतात. o्री गुरू अर्जुनदेव साहेब यांचा शहीद दिन केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे दरवर्षीच मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही साजरा करण्यात आला. यासाठी बटालियनच्या जवानांनी विशेष सहकार्य केले. (प्रतिनिधी

Web Title: Guru Arjun Dev celebrates martyrdom day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.