वीज वापरासंबंधी मार्गदर्शन
By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:18:20+5:302014-09-27T23:18:20+5:30
फिनिक्स सोसायटी गडचिरोली यांच्यावतीने कुनघाडा रै. येथील ग्रामपंचायत सभागृहात विजेच्या वापरासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता.

वीज वापरासंबंधी मार्गदर्शन
कुनघाड रै.: फिनिक्स सोसायटी गडचिरोली यांच्यावतीने कुनघाडा रै. येथील ग्रामपंचायत सभागृहात विजेच्या वापरासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा अल्का धोडरे, तंमुस अध्यक्ष पुंडलिक भांडेकर, सदस्य घनश्याम सूर्यवंशी, उमेश गझलपेलीवार, लीलाधर वासेकर, वामन भांडेकर, ढिवरू भांडेकर, केशव कोठारे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सी. पी. चौधरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चौधरी म्हणाले की, घरातील प्रत्येक बोर्डाला अर्थिंग जोडले असणे आवश्यक आहे. घरामध्ये वायरिंग उघड्यावर ठेवू नये, उपकरणानुसार विद्युत वाहक तारेची जाडी ठरवावी, विद्युत वाहक तारेला एखाद्या व्यक्तीचा स्पर्श होऊन तो तडफडत असल्यास त्याला हाताने न पकडता लाकडी काटीचा वापर करून तार दूर करावी, घरातील छोट्या मुलांना इलेक्ट्रीक शेगडी, इस्त्री, फ्रिज, वॉशिंग मशिन आदी उपकरणे हाताळण्यास प्रतिबंध घालावा, हातपाय आले असल्यास विद्युत संबंधी काम करू नये, विद्युत दुरूस्तीचे काम सुरू असतांना पायात चप्पल घालावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी अलोणे, प्रज्ञा गडपायले, लीलाधर खोब्रागडे, गजानन गव्हारे, प्रतीक उडाण, अमित भांडेकर, चित्रगंधा काटवे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)