शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 01:50 IST2016-10-27T01:50:27+5:302016-10-27T01:50:27+5:30
पंचायत समिती अंतर्गत कार्यरत जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या अनेक समस्या मागील सत्रापासून प्रलंबित आहेत.

शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा
बीडीओंशी चर्चा : प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
चामोर्शी : पंचायत समिती अंतर्गत कार्यरत जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या अनेक समस्या मागील सत्रापासून प्रलंबित आहेत. याचा परिणाम शैक्षणिक प्रक्रियेवर होत आहे. त्यामुळे सदर समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने चामोर्शीचे बीडीओ गोविंद खामकर यांच्याकडे चर्चेद्वारे करण्यात आली. त्यानंतर त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
आॅक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी द्यावे, महागाई भत्ता वाढीची थकबाकी त्वरित अदा करावी, शिक्षकांना नियमित व स्थायी करण्याचे प्रस्ताव जि. प. ला पाठवावे, चटोपाध्याय प्रस्ताव जि. प. ला पाठवावे. सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते जीपीएफला जमा करावे, शिक्षकांच्या गोपनीय अहवालाची एक प्रत तत्काळ द्यावी, परीक्षेला बसण्यासाठी परवानगी मागितलेल्या शिक्षकांना परवानगी द्यावी, अंशदायी पेंशन निवृत्ती योजनेच्या मासिक कपातीचा लेखाजोखा, जि. प. च्या लेखा व वित्त विभागाला पाठवावा, यासह विविध मागण्यांचा समावेश होता. यावेळी तालुकाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, सरचिटणीस मारोती वनकर, प्रशांत सोयाम, पुरूषोत्तम किरमे, सुजीत दास, सविता उराडे, असिम बिश्वास, आर. आर. भोयर, प्रकाश अडेटवार, सुरेश बडगे, नरेंद्र कुनघाडकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)