शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धिक संपदा हक्कांविषयी मार्गदर्शन

By admin | Updated: September 3, 2016 01:32 IST

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान महाराष्ट्र (रूसा), राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्युट प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूर व गोंडवाना विद्यापीठ

गोंडवाना विद्यापीठात कार्यशाळा : पेटन्ट सेलची स्थापना करण्याचा मनोदयगडचिरोली : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान महाराष्ट्र (रूसा), राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्युट प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी बौद्धिक संपदा हक्क या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करून त्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर व रूसाचे सचिव तसेच प्रकल्प अधिकारी मनीषा वर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले. कार्यशाळेला रूसा येथील शरद पाटील डॉ. संजय जगताप, संतोष गुप्ता, डॉ. वर्षा अंधारे, इशरत जहॉन, डॉ. सेबी जोश, उषा गुहा, प्रदीप जयस्वाल, डॉ. व्ही. एस. इरपाते आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान मनिषा वर्मा यांनी रूसा योजनेची माहिती व योजनेचे महत्त्व तसेच उद्दिष्ट याबद्दल माहिती दिली. प्रत्येक विद्यापीठात पेटन्ट सेलची स्थापना करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी उद्घाटनपर भाषणात अनुसंधान व पेटन्ट यांचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेमुळे पेटन्टची नोंदणी प्रक्रिया उपस्थितांना पूर्णपणे समजेल अशा आशावाद व्यक्त केला. राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्युट प्रॉपर्टी मॅनेजमेंट नागपूर येथील संतोष गुप्ता व उषा गुहा यांनी बौध्दिक संपदा या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी कार्यशाळेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची समपर्क उत्तरे दिली. संचालन व आभार बीसीयुडी संचालक डॉ. एस. एम. रोकडे यांनी केले. यशस्वीतेसाठी देवेंद्र झाडे, दिनेश नरोटे, पदव्युत्तर विभागातील सहायक प्रा. डॉ. विवेक जोशी, प्रा. तारे, प्रा. काळे आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)