गटशेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:26+5:30

अत्याधुनिक यंत्रे महाग असल्याने एक शेतकरी ती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गट तयार करून या गटांतर्गत साहित्य खरेदी केल्यास शासन त्यावर अनुदान देते. या साहित्याचा वापर गटातील शेतकऱ्यांसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे गटशेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले.

Guidance for farmers on group farming | गटशेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गटशेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देपीक पाहणी : दोटकुली व जयनगरात सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : दोटकुली व जयनगर येथील शेतकऱ्यांना गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी गटशेतीबाबत मार्गदर्शन केले.
शेतीमध्ये अत्याधुनिक यंत्रांचा वापर केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते. कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य होते. मात्र अत्याधुनिक यंत्रे महाग असल्याने एक शेतकरी ती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गट तयार करून या गटांतर्गत साहित्य खरेदी केल्यास शासन त्यावर अनुदान देते. या साहित्याचा वापर गटातील शेतकऱ्यांसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे गटशेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले.
दोटकुली व जयनगर परिसरातील हरभरा, भाजीपाला पिकाची पाहणी केली. पक्षीथांबे, निंबोळी अर्क घरीच कसे तयार करावे, याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाला शेतकरी हजर होते.

Web Title: Guidance for farmers on group farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी