वेबसाईटवर अजूनही पालकमंत्री आत्रामच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:10 IST2019-06-28T23:09:50+5:302019-06-28T23:10:14+5:30
आठ दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळातून अम्ब्रीशराव आत्राम यांना बाहेर पडावे लागले. तरीही पालकमंत्री म्हणून अम्ब्रीशराव आत्राम यांचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर झळकत आहे.

वेबसाईटवर अजूनही पालकमंत्री आत्रामच
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आठ दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळातून अम्ब्रीशराव आत्राम यांना बाहेर पडावे लागले. तरीही पालकमंत्री म्हणून अम्ब्रीशराव आत्राम यांचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर झळकत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे फोटो आहेत. तसेच जिल्ह्याशी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती या वेबसाईटवर आहे. याच वेबसाईटवरून राज्य शासनाच्या इतर विभागांची माहिती मिळते. नागरिक विविध प्रशासकीय कामांसाठी सदर साईट उघडून पाहतात. आत्राम यांचे मंत्रीपद जाऊन आठ दिवसांचा कालावधी झाला असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एनआयसी विभागाने त्यांचा फोटो काढला नसल्याचे दिसून येत आहे.