जिल्ह्यात करडई पीक रबी क्षेत्र वाढीसाठी उत्तम पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:38 IST2021-03-17T04:38:03+5:302021-03-17T04:38:03+5:30
गडचिराेली : धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असली तरी रबी हंगामातील पिकांचे लागवड क्षेत्र वाढीसाठी करडई पीक लागवड हा ...

जिल्ह्यात करडई पीक रबी क्षेत्र वाढीसाठी उत्तम पर्याय
गडचिराेली : धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असली तरी रबी हंगामातील पिकांचे लागवड क्षेत्र वाढीसाठी करडई पीक लागवड हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र साेनापूर गडचिराेलीच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च राेजी मंगळवारला करडई दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच शेतकरी मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम अडपल्ली येथील करडई उत्पादक शेतकरी जितेंद्र मुप्पीडवार यांच्या शेतात घेण्यात आला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बाेलत हाेते. याप्रसंगी ते प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक तथा आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाडे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ज्ञ ज्ञानेश्वर ताथाेड, नरेश बुद्धेवार, प्रवीण नामूर्ते आदी मान्यवर उपस्थित हाेते.
याप्रसंगी संदीप कऱ्हाडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना करडई पिकाचे महत्व सांगितले. करडईचा उपयाेग तेल मिळविण्यासाठी केला जाताे. करडईमध्ये औषधी गुणधर्म माेठ्या प्रमाणात आहे. ज्यामुळे हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आदी विकारावर उपयुक्त आहे. करडईची पेंड जनावरासाठी पाैस्टीक खाद्य म्हणून वापरले जाते, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर ताथाेड यांनी करडई पिकांची काढणी व मळणीबाबत मार्गदर्शन केले. काढणी व मळणी यंत्र या पिकाच्या काढणीसाठी उपयुक्त आहे. तसेच यावेळी राेटावेटर, पेरणीयंत्र, शून्य मशागत पेरणी यंत्र, पाॅवर टीलर व पाेस्ट हाेलडीगर आदींचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
यावेळी नरेश बुद्धेवार यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना विक्रीसाठी यावेळी छत्रीचे वितरण करण्यात आले.