घरकुल लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST2021-07-17T04:28:14+5:302021-07-17T04:28:14+5:30
निवेदनात म्हटले आहे की, देसाईगंज नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-४ अंतर्गत एकूण ११६ डीयूएस ...

घरकुल लाभार्थ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे
निवेदनात म्हटले आहे की, देसाईगंज नगर परिषदेत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-४ अंतर्गत एकूण ११६ डीयूएस घरकुलाचा पहिला डीपीआर केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीकडून २५ मार्च २०१९ रोजी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याचे अनुदान प्रत्येकी १ लाखाचा निधी ४ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला होता. तसेच एकूण ३९३ डीयूएस घरकुलाचा दुसरा डीपीआर केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीकडून २७ नोव्हेंबर २०१९ रोजी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याचे अनुदान प्रत्येकी १ लाख रुपये २३ ऑक्टोबर २०२०ला आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते संबंधित लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे, मात्र केंद्र शासनाकडून रक्कम प्राप्त न झाल्याने घरकुल बांधकाम रखडले असून, यामुळे लाभार्थी अधिकच अडचणीत आले आहेत. ही बाब लक्षात घेता सदर योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या हिश्याचे उर्वरित अनुदान तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी खरकाटे यांनी केली आहे.