मेच्या पहिल्या आठवड्यातच मिळणार माेफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:52+5:302021-04-28T04:39:52+5:30

काेट स्वस्त धान्य याेजेनेंतर्गत कुटुंबाचे धान्य खरेदी करण्यासाठी केवळ ७० ते ८० रुपये एवढाच खर्च येतो. आता शासन माेफत ...

Grain will be available in the first week of May | मेच्या पहिल्या आठवड्यातच मिळणार माेफत धान्य

मेच्या पहिल्या आठवड्यातच मिळणार माेफत धान्य

काेट

स्वस्त धान्य याेजेनेंतर्गत कुटुंबाचे धान्य खरेदी करण्यासाठी केवळ ७० ते ८० रुपये एवढाच खर्च येतो. आता शासन माेफत धान्य देत आहे. म्हणजेच लाभार्थ्याचे केवळ ७० ते ८० रुपयेच वाचणार आहेत. एका व्यक्तीला ५ किलाे धान्य महिनाभर पुरत नाही. त्यामुळे बाहेरच्या बाजारपेठेतून धान्य खरेदी करावे लागते. माेफत धान्य देण्याऐवजी दुप्पट धान्य देण्याची गरज हाेती.

-कालीदास बन्साेड, लाभार्थी

काेट

संचारबंदी उन्हाळाभर चालणार आहे. त्यामुळे केवळ एक महिना धान्य पुरवून कसे चालणार. जून व जुलै महिन्यातही माेफत व दुप्पट धान्य देण्याची गरज आहे. शासन स्वत:चा गाजावाजा करून घेण्यासाठी अशा प्रकारच्या याेजना राबविते. केवळ धान्यच खाऊन जगू शकत नाही. त्यासाेबत तेल, तिखट, मसाला, भाजीपाला आदींचूही गरज भासते. राेजगार गेल्याने या वस्तू आता खरेदी करणे कठीण झाले आहे. राेख मदतीची आवश्यकता हाेती.

-सचिन नैताम, लाभार्थी

काेट

लाभार्थ्यांना लवकरात लवकर धान्य मिळावे यासाठी अन्न व पुरवठा विभाग काम करीत आहे. शासनाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून दिले जाईल.

-नरेंद्र भागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

आकडेवारी

एकूण रेशनकार्डधारक- २,२६,५८८

बीपीएल- ३१,२००

अंत्याेदय- ९२,१३४

केशरी- ६७,६७९

Web Title: Grain will be available in the first week of May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.