ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांकडून आपद्ग्रस्त कुटुंबाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:38 IST2021-05-18T04:38:06+5:302021-05-18T04:38:06+5:30
कुरूड येथील अंताराम कांबळी यांच्या घराला १५ मे राेजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली. आगीने भीषण रूप धारण ...

ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांकडून आपद्ग्रस्त कुटुंबाला मदत
कुरूड येथील अंताराम कांबळी यांच्या घराला १५ मे राेजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली. आगीने भीषण रूप धारण केल्याने देसाईगंज येथील अग्निशमन वाहनाला बाेलावण्यात आले. परंतु आग इतकी भीषण हाेती की संपूर्ण घर जळून खाक झाले. सदर घटनेची माहिती मिळताच कुरूड ग्रामपंचायतच्या सरपंच प्रशाला अविनाश गेडाम व उपसरपंच क्षितिज उके यांनी भेट देऊन विचारपूस केली व शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल; परंतु सध्या सरपंच व उपसरपंच यांनी वैयक्तिक आर्थिक मदत वृद्ध दाम्पत्याला दिली. शासकीय पातळीवर लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. तसेच ग्रामपंचायत कुरूडकडूनसुद्धा सदर वृद्ध दाम्पत्याला घरकुल देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य व माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, शंकर पारधी, विलास पिलारे, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभलवार, शालिक मिसार, भास्कर वाटकर, राजेश्वर कांबळी हजर होते.
===Photopath===
170521\17gad_9_17052021_30.jpg
===Caption===
वृद्ध दाम्पत्याला आर्थिक मदत देताना सरपंच प्रशाला गेडाम व उके.