गोपीनाथ मुंडे म्हणाले, ‘लोकमत’ बहुजनांचा आधार

By Admin | Updated: June 6, 2014 00:00 IST2014-06-06T00:00:52+5:302014-06-06T00:00:52+5:30

बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले गोपीनाथ मुंडे यांचा विदर्भाच्या ग्रामीण भागाशी अनेकदा संपर्क आला. १९९0-९१ मध्ये विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी चंद्रपूर लोकमत कार्यालयाला भेट दिली होती.

Gopinath Munde said, 'Lokmat' basis of Bahujan | गोपीनाथ मुंडे म्हणाले, ‘लोकमत’ बहुजनांचा आधार

गोपीनाथ मुंडे म्हणाले, ‘लोकमत’ बहुजनांचा आधार

गडचिरोली : बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले गोपीनाथ मुंडे यांचा विदर्भाच्या ग्रामीण भागाशी अनेकदा संपर्क आला. १९९0-९१ मध्ये विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी चंद्रपूर लोकमत कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी लोकमत हा बहुजन समाजाचा आरसा आहे. येथे येऊन मी आनंदीत झालो, असे भावपूर्ण उद्गार काढले होते.
या जुन्या आठवणींना लोकमतचे तत्कालीन जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार धाईत यांनी उजाळा दिला आहे. या जुन्या आठवणीबद्दल बोलताना धाईत म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासात दोन-तीन तास घालविण्याचा मला योग आला. मी चंद्रपूर लोकमत कार्यालयात जिल्हा प्रतिनिधी होतो. सन १९९0-९१ या काळात गोपीनाथ मुंडे विरोधी पक्ष नेते  होते. विदर्भात पावसाने दडी मारली. दुष्काळसदृष्य परिस्थिती जाणवू लागली होती. शेतकर्‍यांच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी मुंडे साहेब विदर्भाच्या दौर्‍यावर चंद्रपुरात आले. दुपारची वेळ होती. सर्कीट हाऊसमध्ये त्यांनी पत्रकार परिषद बोलाविली. तेथे सर्व पत्रकार हजर झाले. दुष्काळी स्थितीवर ते पत्रकारांशी बोलत असताना वरूण राजाने हजेरी लावली.
आपले आगमन होताच चंद्रपुरात पावसाने स्वागत केले. हा आपला पायगुण समाजावा काय? असा प्रश्न केल्यावर ते हसले. पत्रकार परिषद संपल्यावर त्यांनी बोलावून घेतले व त्यावेळी परिचय झाला. मी विदर्भ वंजारी समाजाचा गडचिरोली जिल्हा संयोजक आहे व लोकमत परिवाराचा सदस्य म्हणून काम करीत आहे. ही ओळख देताच अर्धा तास वंजारी समाजाच्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात समस्यांबाबत ते मोकळ्या पणाने बोललेत. शेवटी गोपीनाथ मुंडे यांना विनंती केल्यावर त्यांनी लोकमत जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट देण्याचेही मान्य केले. त्यानंतर ते लोकमत कार्यालयात आले. त्यानंतर तेव्हाचे कार्यालय प्रमुख अशोक बोथरा यांना मुंडे साहेबांशी झालेला वार्तालाप व चर्चा सांगितली आणि आम्ही सारे मुंडे साहेबांच्या स्वागतासाठी कार्यालयात सज्ज झालो. अध्र्या तासात मुंडे साहेबांच्या गाड्यांचा ताफा लोकमत कार्यालयात येऊन धडकला. सोबत हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी होते. तब्बल एक तास मुंडे साहेबांनी लोकमत परिवारासोबत घालविला. लोकमत बहुजनांचा आरसा आहे. येथे येऊन मी आनंदी झालो, असे उद्गार त्यांनी काढले.
अशोक बोथरांसह सर्व लोकमत परिवाराने पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला. जाताना मुंडे साहेबांनी विविध खात्यात नोकरीला असलेल्या वंजारी समाजाच्या अधिकार्‍यांशी माझी ओळखही करून दिली. हा माझ्या जीवनातील मोठाच प्रसंग होता. वंजारी समाजासाठी त्यांनी विदर्भात व मराठवाड्यात प्रचंड काम केले. दारिद्रय़ात वास्तव्य करणार्‍या या समाजासाठी विकासाचे दालन त्यांनी मोकळे करून दिले. वंजारी समाजाला विमुक्त जाती-जमातीत तसेच इतर मागास वर्गीयांमध्ये जाणार्‍या ओबीसींनाही त्यांनी विकासाची दिशा दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
 

Web Title: Gopinath Munde said, 'Lokmat' basis of Bahujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.