शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

गोंडवाना विद्यापीठाला वन आणि आदिवासी संशोधन केंद्र बनवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 8:59 PM

केंद्र सरकारकडून गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी मोठा निधी मिळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठळक मुद्देदोन टप्प्यात विकासउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासीबहुल आणि जंगलाने आच्छादित असलेल्या भागात असणारे गोंडवाना विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे. त्यामुळे या विद्यापीठाला वन आणि आदिवासी संशोधनाचे केंद्र बनविण्यासाठी कायद्यात योग्य त्या सुधारणा करून विशेष विद्यापीठाचा दर्जा मिळू शकतो. तसे झाल्यास केंद्र सरकारकडून या विद्यापीठाच्या विकासासाठी मोठा निधी मिळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

गोंडवाना विद्यापीठाने येत्या ५ ऑक्टोबरपासून विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी ना.सामंत सोमवारी गडचिरोलीत आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्यापीठाशी निगडीत विविध विषयांची माहिती दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, उच्च शिक्षण सहसंचालक साळुंखे आणि सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ना.सामंत म्हणाले, दोन टप्प्यात विद्यापीठाचा विकास करण्याचे नियोजन आहे. त्यात पहिल्या टप्प्यात १९१ एकरापैकी ५० एकर जागेची खरेदी आणि त्यावरील इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लावणार तर दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करून पुढील कामे केली जातील. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सकारात्मक असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे या विषयावर बोलणेही झाले असल्याचे ते म्हणाले. गोंडवाना विद्यापीठाला ‘मॉडेल कॉलेज’ करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.कोरोनाची परिस्थिती थोडी सावरल्यानंतर राज्यातील सर्वच भागात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्याची परवानगी दिली जाईल. विविध आरक्षणाच्या बाबतीतही सर्व शंकांचे निरसन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

तांत्रिक अडचणी आल्या तरी परीक्षा देता येणार१७ हजार २२९ विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा देत आहेत. त्यात केवळ ७०६ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. ऑनलाईन परीक्षेत दुर्गम भागात वेळेवर नेटवर्कची समस्या निर्माण झाली तर त्या विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेतला जाईल. पण कोणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास ना.सामंत यांनी दिला.

सहसंचालक कार्यालयाचे केंद्र गडचिरोलीतउच्चशिक्षण सहसंचालकांचे कार्यालय नागपूर येथे आहे. गडचिरोली किंवा चंद्रपूर जिल्ह्यातून नागपूरला जाण्यासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. हा त्रास वाचवण्यासाठी त्यांच्या कार्यालयाचे एक केंद्र गडचिरोलीत सुरू करण्याचा निर्णय मुंबईत गेल्यानंतर काढणार असल्याचे मंत्र्यांना सांगितले. कामे मार्गी लागण्यासाठी सहसंचालक १५ दिवसातून एक वेळ गडचिरोलीतील कार्यालयात उपलब्ध राहतील.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रUday Samantउदय सामंत