देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ते असे खरे ठरते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:35 IST2017-12-09T20:35:07+5:302017-12-09T20:35:42+5:30
जिल्ह्यातल्या आलापल्ली तालुक्यातील आष्टी मार्गावर असलेल्या बोरी गावानजिक आलापल्लीकडे येणारी एक कार शनिवारी दुपारी नाल्याला कठडा नसल्याने अनियंत्रित होऊन कलंडली.

देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ते असे खरे ठरते
ठळक मुद्देझुडुपाने वाचविले प्राण
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली तालुक्यातील आष्टी मार्गावर असलेल्या बोरी गावानजिक आलापल्लीकडे येणारी एक कार शनिवारी दुपारी नाल्याला कठडा नसल्याने अनियंत्रित होऊन कलंडली. ती नाल्यामध्ये पडत असतानाच नाल्याच्या बाजूला असलेल्या मजबूत झुडूपाला ती अडकली व होणारा अपघात टळला आणि जिवीतहानी झाली नाही. ही गाडी आंध्रप्रदेशातून आलापल्लीकडे येत होती.