जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेळ्या़, मेंढ्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST2021-03-27T04:38:22+5:302021-03-27T04:38:22+5:30

शेतकरी दरवर्षी खरीप - रब्बी पीक निघाल्यावर शेतजमिनीची दुरुस्ती करीत असतात त्यामुळे जमिनीच्या वरच्या स्तरात पहिल्या वर्षी सुपीकता कमी ...

Goat, sheep support to increase soil fertility | जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेळ्या़, मेंढ्यांचा आधार

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेळ्या़, मेंढ्यांचा आधार

शेतकरी दरवर्षी खरीप - रब्बी पीक निघाल्यावर शेतजमिनीची दुरुस्ती करीत असतात त्यामुळे जमिनीच्या वरच्या स्तरात पहिल्या वर्षी सुपीकता कमी असते. ती सुपीकता टिकून राहावी यासाठी जमिनीला सेंद्रिय खतच चांगले असते असा शेतकऱ्यांचा समज आहे. शेतकरी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतात शेणखत टाकत असतात मात्र बैलबंडीअभावी बरेच शेतकरी शेणखत टाकण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. शेणखत टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर हा साधनांचा वापर करीत असतात सध्या प्रति ट्रॅक्टर ५०० रुपये असे खत टाकण्याचे भाडे आहे त्यामुळे काही मोजकेच शेतकरी शेणखत जमिनीत टाकत असतात . त्याऐवजी रासायनिक खत वापरून पीक घेत असतात. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची पोत बिघडत चालली असून केवळ एकच पीक शेतजमीन चांगले येऊ शकते. दुबार पीक घ्यायचे झाले तर पुन्हा खताचा वापर करावा लागतो; मात्र सेंद्रिय खत जमिनीची सुपीकता व पीक निरोगी ठेवण्यासाठी अधिक महत्त्वाचे काम करीत असते. त्यामुळे शेतकरी शेतात शेळ्या - मेंढ्यांचा कळप बसवत असतात. दरम्यान, आता परजिल्ह्यातील मेंढपाळ शेतातील पीक निघाल्यावर ग्रामीण भागात डेरेदाखल हाेत असतात व ते जवळपास चार महिने राहत असतात. शेतात कोणतेही पीक राहत नसल्याने या कालावधीत चराईसाठी जागा उपलब्ध होत असते . त्यामुळे मेंढपाळ दिवसभर चराई झाल्यावर सायंकाळी ज्या शेतमालक शेतात कळप बसवितात त्या ठिकाणी शेळ्या-मेंढ्याचा कळप बसवत असतात यासाठी शेतकरी मेंढपाळांना शेळ्या व मेंढ्याच्या संख्येवर त्यांना मोबदला पैसे व धानाच्या स्वरूपात देत असतात.यासाठी शेतकरी कळप बसवण्यासाठी मेंढपाळांना मनधरणी करीत असतात. याबाबत मेंढपाळ यांना विचारणा केली असता उन्हाळ्यात हंगामी स्वरूपात रोजगार यामुळे प्राप्त होत असतो यातूनच चार पैसे कमाई होते व शेळ्या व मेंढ्यांची देखभाल होत असते. एवढ्या संख्येत असलेल्या शेळ्या मेंढ्यांना घरी गोठा बांधून ठेवणे शक्य नसते त्यामुळे चार महिने उत्पन्न मिळते व मेंढ्यांची काळजी घेणेही सोपे जाते असे त्यांनी सांगितले. सध्या रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले असल्याने शेतकऱ्यांचा दरवर्षी पीक लागवड खर्च वाढत चालला आहे. त्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी दरवर्षी कर्ज घ्यावे लागत असते. त्यामुळे शेतकरी खताची बचत व्हावी व पीक भरघाेस यावे यासाठी शेतात शेळ्या व मेंढ्यांचे कळप बसवत आहेत.

बाॅक्स

खताचे ट्रॅक्टर भाडे ७०० रुपये

शेतकरी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतात शेणखत टाकत असतात मात्र बैलबंडीअभावी बरेच शेतकरी शेणखत टाकण्याकडे दुर्लक्ष करीत असतात. शेणखत टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर या साधनांचा वापर करीत असतात. सध्या प्रति ट्रॅक्टर ७०० रुपये असे खत टाकण्याचे भाडे आहे. खत टाकणीसाठी बरेच पैसे लागत असल्याने काही मोजकेच शेतकरी शेणखत जमिनीत टाकत असतात. रासायनिक खताचा वापर अधिक केला जाताे.

Web Title: Goat, sheep support to increase soil fertility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.