ऑनलाइन शिक्षणाने लावला मुलांना चष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST2021-07-16T04:26:00+5:302021-07-16T04:26:00+5:30

बाॅक्स ... लहान मुलांना हे धाेके - सातत्याने बसून माेबाइलकडे बघितल्याने मान दुखणे व पाठीचा कणा दुखण्याचा त्रास वाढत ...

Glasses for kids with online education | ऑनलाइन शिक्षणाने लावला मुलांना चष्मा

ऑनलाइन शिक्षणाने लावला मुलांना चष्मा

बाॅक्स ...

लहान मुलांना हे धाेके

- सातत्याने बसून माेबाइलकडे बघितल्याने मान दुखणे व पाठीचा कणा दुखण्याचा त्रास वाढत आहे.

- माेबाइल बघत मुले घरीच राहिल्याने ते एकलकाेंडे हाेण्याचा धाेका आहे.

- माेबाइलवरील शिक्षण न समजल्यास विद्यार्थ्यामध्ये नकारात्मकता निर्माण.

बाॅक्स .......

लहान मुलांमध्येही डाेकेदुखी वाढली

१ सातत्याने माेबाइलकडे पाहिल्यामुळे डाेळ्यांवर ताण पडतो. त्यामुळे डाेळे व डाेके दुखण्यास सुरुवात हाेते.

२ डाेळ्यांमधून पाणी येते. खाज निर्माण हाेते.

३ ज्यांच्या डाेळ्यांना नंबर नाही त्यांना नंबर लागतात व ज्यांना नंबर हाेते त्यांच्या नंबरमध्ये वाढ हाेते.

काेट .......

२० मिनिटांनंतर २० सेकंद डाेळ्यांना आराम द्यावा

प्रत्येक २० मिनिटांनंतर डाेळ्यांना २० सेकंद आराम द्यावा, यासाठी डाेळे बंद करावे. जवळपास २० मीटर दूर अंतरावर बघावे. यामुळे डाेळ्यांवरील ताण कमी हाेण्यास मदत हाेते. माेबाइल किंवा संगणकावर अभ्यास करताना टेबल, खुर्चीचा वापर करावा. डाेळे व माेबाइल हे समान उंचीवर असावे. डाेळ्यांच्या समाेर खिडकी किंवा दरवाजा नसावा. त्यातून प्रकाश येण्याची शक्यता राहते. खाेलीत एकदम अंधार नसावा. डाेळ्यांचे आराेग्य चांगले राहण्यासाठी गाजर, पपइ, बीट, सेप, हिरवा भाजीपाला सेवन करावा. डाेळ्यांचा त्रास वाढल्यास डाॅक्टरांशी संपर्क साधावा.

- डाॅ. अद्वय अप्पलवार, नेत्रराेगतज्ज्ञ, गडचिराेली.

काेट ......

ऑनलाइन शिक्षणामुळे डाेळ्यांसह बालकाच्या आराेग्याच्या इतरही समस्या वाढल्या आहेत. काही वेळानंतर माेबाइलवरून लक्ष हटवून डाेळ्यांना काही काळ विश्रांती देण्याचा सल्ला डाॅक्टर देत असले तरी एकदा अध्ययनाला सुरुवात केल्यानंतर ताे सातत्याने माेबाइलचा वापर करताे. त्यामुळे डाेळ्यांची समस्या वाढली आहे.

- याेगाजी किरणापुरे, पालक

Web Title: Glasses for kids with online education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.