दोन वर्षांपासून रखडलेली रोहयो मजुरी द्या
By Admin | Updated: October 26, 2016 01:54 IST2016-10-26T01:54:08+5:302016-10-26T01:54:08+5:30
धानोरा तालुक्यातील सालेभट्टी येथील मजुरांची दोन वर्षांपासून रोहयो मजुरी रखडली आहे.

दोन वर्षांपासून रखडलेली रोहयो मजुरी द्या
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सालेभट्टी येथील मजूर अडचणीत
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सालेभट्टी येथील मजुरांची दोन वर्षांपासून रोहयो मजुरी रखडली आहे. सदर मजुरी तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून गावकरी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे.
२०१४-१५ मध्ये रोजगार हमी योजनेतून सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करण्यात आले. सदर कामास दोन वर्ष पूर्ण झाले. परंतु मजुरांची मजुरी अजूनपर्यंत मिळाली नाही. याबाबत ग्रामसेवकांना विचारले असता १० आॅक्टोबरपर्यंत मजुरी देण्यात येईल, असे हमीपत्र संबंधित ग्रामसेवकाने लिहून दिले. रोजगार हमीचे वेतन बँक खात्यामध्ये जमा होणे आवश्यक होते. परंतु तसे न करता १०० रूपये प्रमाणे काही मजुरी नगदी स्वरूपात देण्यात आली. उर्वरित रक्कम दोन आठवड्यात देण्यात येईल, असे सांगितले. परंतु अजूनपर्यंत दिली नाही. निवेदन देतेवेळी रामदास बोगा, मनोहर पोरेटी, सीताराम सिडाम, पतीराम बोगा, मिलींद किरंगे, विनोद बोरकर, श्यामराव आतला, तुळशिराम दुग्गा, रतीराम दुग्गा, शेषराव सिडाम, पुण्यकला हरामी, ललीता दुग्गा, देवाजी आतला उपस्थित होते.