लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील राजाराम परिसरातील चिरेपल्ली, कोतागुड्डम, पत्तीगाव, खांदला, मरनेली, गोलाकर्जी, रायगट्टा आदी गावातील शेतकºयांना वनहक्काचे पट्टे मिळाले नसल्याने हे अतिक्रमणधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांचे वनहक्क पट्ट्याचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढून त्यांना पट्टे देण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.राजाराम परिसरातील सात-आठ गावातील अतिक्रमणधारक शेतकºयांनी वनहक्काचे दावे तयार केले आहेत. वनहक्क कायदा २००५ नुसार वनहक्क दाव्याचा स्वीकार करण्यात यावा. तसेच सर्वेक्षण करून प्रलंबित दावे पूर्ण करून ते देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा नेतृत्वात अहेरीचे उपविभागीय अधिकारी सचिन अंबोते यांच्या मार्फत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. यावेळी जि.प. सदस्य अजय नैताम, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, अशोक येलमुले, उपसरपंच संजय पोरतेट, वन हक्क समितीचे अध्यक्ष रंगा आलाम, नारायण आत्राम हजर होते.
प्रस्ताव निकाली काढून पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:51 IST
तालुक्यातील राजाराम परिसरातील चिरेपल्ली, कोतागुड्डम, पत्तीगाव, खांदला, मरनेली, गोलाकर्जी, रायगट्टा आदी गावातील शेतकºयांना वनहक्काचे पट्टे मिळाले नसल्याने हे अतिक्रमणधारक शेतकरी अडचणीत आले आहेत.
प्रस्ताव निकाली काढून पट्टे द्या
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांकडे मागणी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन