अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:59 IST2017-11-14T23:59:20+5:302017-11-14T23:59:32+5:30
तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे.

अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे. महसूल व वन विभागाने काही लोकांचे नोंदी व पिवार तयार केले आहेत. मात्र आम्हाला अद्यापही वन जमिनीचे पट्टे मिळाले नाही. त्यामुळे शासकीय सोयीसुविधांचा लाभ घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आम्हा अतिक्रमणधारकांना तत्काळ वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी अतिक्रमणधारक शेतकºयांनी केली आहे.
या संदर्भात अतिक्रमणधारक शेतकºयांनी सोमवारी थेट एटापल्ली येथील उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. व उपविभागीय अधिकाºयांना लेखी निवेदन दिले. मागण्यांचे हे निवेदन या कार्यालयातील नायब तहसीलदार डोर्लीकर यांनी स्वीकारले.
याप्रसंगी जि. प. सदस्य संजय चरडुके, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, शेतकरी संघटना शाखेचे अध्यक्ष हरिदास टेकाम, उपाध्यक्ष केशव पेदापल्लीवार, सचिव लक्ष्मण चन्नेवार आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील जारावंडी, दोलंदा, दिंडवी, भापडा, जांभुळगट्टा, गर्तावाही, मंजीगड, इरपनपायली, मालेनगट्टा, हनपायली, वेडमागड, टेक्का, कसुरवाही, सरखेडा व वडोली भागातील शेतकºयांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती कसने सुरू केले आहे. वनहक्क अधिनियम २००६ नुसार तसेच २००८ नुसार आम्ही प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र आमचे वनदाव्याचे प्रस्ताव प्रलंबितच आहेत. पट्टे न मिळाल्यामुळे शेती उपयोगासाठी शासकीय सवलती घेता येत नाही. या दृष्टीने कार्यवाही करून वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे.