देसाईगंजला स्वतंत्र बाजार समिती द्या

By Admin | Updated: February 3, 2015 22:55 IST2015-02-03T22:55:16+5:302015-02-03T22:55:16+5:30

जिल्ह्याची व्यावसायिक बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात यावी, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी

Give an independent market committee to DesaiGanj | देसाईगंजला स्वतंत्र बाजार समिती द्या

देसाईगंजला स्वतंत्र बाजार समिती द्या

देसाईगंज : जिल्ह्याची व्यावसायिक बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात यावी, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.
२६ आॅगस्ट १९८२ ला गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र आरमोरी येथे संयुक्त कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात आली व देसाईगंज येथे उप बाजारपेठ देण्यात आली. गेल्या ३०-३२ वर्षांच्या काळात देसाईगंज उपबाजार समितीचा कोणताही विकास झाला नाही. आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत देसाईगंज, कुरखेडा, कोरची, आरमोरी हे तालुके येतात. राज्यात शिवसेना भाजपची सत्ता असताना गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून चामोर्शी ही नवी बाजार समिती निर्माण करण्यात आली. त्यावेळीही देसाईगंज बाजार समितीच्या निर्मितीवर दुर्लक्ष झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे मोटवानी यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Give an independent market committee to DesaiGanj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.