बिट कटाईचे काम स्थानिकांना द्या
By Admin | Updated: February 4, 2015 23:14 IST2015-02-04T23:14:49+5:302015-02-04T23:14:49+5:30
वन विभागामार्फत विविध कामे वन मजुरांच्या माध्यमातून केली जातात. बिट व बांबू कटाईची कामे करताना स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य द्यावे, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी

बिट कटाईचे काम स्थानिकांना द्या
घोट : वन विभागामार्फत विविध कामे वन मजुरांच्या माध्यमातून केली जातात. बिट व बांबू कटाईची कामे करताना स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य द्यावे, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी यांनी घोट येथे आयोजित वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
बैठकीत वन परिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, तांबटकर, वन परिक्षेत्राधिकारी तनपुरे, जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के, माजी जि. प. सदस्य स्वप्नील वरघंटे, विलास गण्यारपवार, गोपी बांकावार, ऋषी कोडापे, रमेश कन्नाके, रमेश अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. होळी यांनी जळाऊ लाकूड व बांबू पुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली.
वन विभागात मोठ्या प्रमाणात कूप व बांबू कटाईचे काम केले जाणार असल्याने सदर काम स्थानिक लोकांना देण्यात यावा, गावकऱ्यांना सरकारी दराने बिट व बांबू देऊन बांबू कटाईच्या कामात प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश होळी यांनी दिले. निस्तार डेपोमध्ये बिट व बांबूची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले. क्षेत्रातील जंगल वाचविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच नवीन जंगल तयार करण्यासाठी वन विभागाने पुढे येऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करावी. जिल्ह्यात दरवर्षी जंगलात वृक्ष लागवड केली जाते. मात्र अनेक झाडे एका वर्षातच नेस्तनाबूत होतात. त्यामुळे वृक्ष लागवडीवर केलेला खर्च वाया जातो. एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर काही कर्मचारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे वृक्ष अल्पावधीतच नष्ट होतात. यावरही चिंतन करण्यात आले. (वार्ताहर)