शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आरमोरी क्षेत्रात काँग्रेसचे मसराम ठरले 'जायंट किलर'; अहेरीत पुन्हा धर्मरावबाबांचाच रुबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 15:27 IST

Gadchiroli Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidates : गडचिरोलीत भाजपच्या नरोटेंची काँग्रेसच्या पोरेटींना धोबीपछाड

संजय तिपाले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात एका दशकापासून महायुतीचे वर्चस्व आहे. गडचिरोलीअहेरी हे दोन गड शाबूत ठेवत महायुतीने यावेळी देखील आपला रुतबा दाखवला, पण महाविकास आघाडीतील काँग्रेसने आरमोरीत भाजपचे पानिपत केले. तेथे विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना पराभवाची धूळ चारुन काँग्रेसचे रामदास मसराम हे 'जायंट किलर' ठरले. तब्बल दहा वर्षांनंतर आरमोरीचा गड काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतला. जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस असे तीन वेगवेगळ्या पक्षांचे आमदार विधानसभेत पाठवून 'सबका साथ'चा प्रत्यय दिला. 

जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात मोठी चुरस होती. आरमोरी व गडचिरोलीत भाजप व काँग्रेसमध्येच थेट झुंज झाली. आरमोरीत सलग दोन टर्म आमदार असलेल्या कृष्णा गजबे यांना अवघ्या ११ महिन्यांपूर्वी शिक्षकपदाचा राजीनामा देऊन राजकारणात आलेल्या रामदास मसराम यांनी चित केले, गडचिरोलीत भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे यांनी काँग्रेसच्या मनोहर पोरेटी यांना धोबीपछाड दिला तर अहेरीत महायुतीतील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) मंत्री धर्मरावबाबा आत्राम व पुतणे बंडखोर अपक्ष उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम यांच्यात खरा सामना झाला. तेथे राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) मैदानात आलेल्या धर्मरावबाबा यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे, अहेरी वगळता आरमोरी व गडचिरोलीत बंडखोर उमेदवारांची कामगिरी अतिशय सुमार ठरली. त्यामुळे मतविभाजनाचे अंदाज सपशेल फोल ठरले. याचा फायदा पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना झाला. गडचिरोली व अहेरीतील विजयाने महायुतीचा वरचष्मा अबाधित राहिला, पण आरमोरीत काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला, सर्वाधिक मताधिक्क्यांसह मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विजय खेचून आणला, त्यापाठोपाठ डॉ. मिलिंद नरोटे यांचा क्रमांक लागतो तर आरमोरीत काँग्रेसच्या रामदास मसराम यांनी जेमतेम ६ हजार २१० मताधिक्क्यासह विजय मिळवला. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची धुरा सांभाळली, तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकहाती खिंड लढवली.

विजयाचे श्रेय मतदारांना"ही शेवटची निवडणूक महायुती सरकारने केलेल्या विकासकामांची पावती म्हणून जनतेने भरभरून मतदान केले. महायुतीतील सर्व घटकपक्षाला मानणाऱ्या मतदारांना या विजयाचे श्रेय जाते. बाप बाप होता है.... शेवटी लोक त्यांची कामे कोण करतो, हे पाहून मते देतात. पाच वर्षांत अहेरीचा अधिकाधिक विकास करायचा आहे. ही माझी शेवटची निवडणूक होती"- धर्मरावबाबा आत्राम राष्ट्रवादी अ.प

विजयाची कारणे लाडकी बहीण योजनेंतर्गत मतदारसंघातील ७७ हजार महिलांना लाभ. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला महिला मतदानाचा टक्का ७.५६ इतका वाढला. त्याचा चांगला फायदा झाला. महाविकास आघाडीत काँग्रेसचे हनमंतु मडावी यांनी बंडखोरी केली, त्यामुळे कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांचे मतविभाजन झाले. यामुळे मार्ग अधिक सुकर झाला. महायुतीत बंडखोरी करणारे भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम हे अपक्ष मैदानात होते. मात्र, त्यांची कार्यपध्दती, कच्चे दुवे शोधून सोशल मीडियातून नेमकेपणाने संदेश देणारे रिल्स, व्हिडीओ महत्त्वाचे ठरले. 

कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ, विश्वास सार्थ ठरविणार "महायुती सरकारने राज्यात लोककल्याणकारी योजना राबविल्या. त्याची पोचपावती म्हणून जनतेने साथ दिली. पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकत्र्याला उमेदवारी दिली, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून यश खेचून आणले. आता मतदारांना दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करायची आहे. जनतेने टाकलेला विश्वास कदापि वाया जाऊ देणार नाही."- डॉ. मिलिंद नरोटे भाजप

विजयाची कारणे डॉ. मिलिंद नरोटे यांच्या रुपाने भाजपने कोरी पाटी असलेला उमेदवार मैदानात उतरविला, सुशिक्षित व सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असल्याने त्यांचा सर्वस्तरात संपर्क होता, त्याचा फायदा झाला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा कॉल भाजपला मिळाला, शिवाय चामोर्शीतील बंगाली बहुल गावातूनही मताधिक्क्य मिळाले. कुणबी, ओबीसी बांधवांनीही साथ दिली. लोकसभा निवडणुकीझालेल्या चुकांमध्ये सुधारणा केली. संघटन बांधणी करुन महायुती सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविल्या. बंडखोरी रोखण्यात यश आले.

आरमोरीकरांच्या विकासाचे स्वप्न सत्यात उतरविणार "भाजपच्या हुकूमशाही कारभाराला आरमोरीच्या बहाद्दर मतदारांनी दिलेली ही सणसणीत चपराक आहे. आरमोरीकरांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला आमदार केले. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. येत्या पाच वर्षांत आरमोरीचा सर्वांगीण विकास करणे व जाहीरनाम्यातील सर्व वचनांची पूर्तता करणे हेच माझे ध्येय आहे."- रामदास मसराम काँग्रेस

विजयाची कारणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून ३४ हजारांहून अधिकचे मताधिक्यय होते, है सत्ताविरोधी वातावरण विधानसभेतही टिकविण्यात यश आले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या मतदारसंघात विशेष लक्ष घालून स्वतः प्रचारयंत्रणा हाती घेतली. दहा वर्षे सत्ता नसल्याने विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणले, बंडखोर माजी आमदार आनंदराव गेडाम व डॉ. शिलू चिमूरकर यांना अनुक्रमे दोन व एक हजार मतेही खेचता आले नाहीत. त्यामुळे व्होट बैंक शाबूत राहिली

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Gadchiroliगडचिरोलीgadchiroli-acगडचिरोलीarmori-acअरमोरीaheri-acअहेरीBJPभाजपाMahayutiमहायुती