वर्षभरात गॅस सिलिंडर २९६ रुपयांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST2021-07-17T04:27:57+5:302021-07-17T04:27:57+5:30
गडचिराेली : मागील वर्षभराच्या कालावधीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सुमारे २९६ रुपयांनी वाढली आहे. जुलै २०२० मध्ये गॅस सिलिंडरची ...

वर्षभरात गॅस सिलिंडर २९६ रुपयांनी वाढले
गडचिराेली : मागील वर्षभराच्या कालावधीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सुमारे २९६ रुपयांनी वाढली आहे. जुलै २०२० मध्ये गॅस सिलिंडरची किंमत ५९५ रुपये हाेती. ती जुलै २०२१ मध्ये आता ८९१ रुपये एवढी झाली आहे. सबसिडीची रक्कम मात्र ४० रुपयेच कायम आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिकचा बाेजा सहन करावा लागत आहे.
गॅसवर स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न २०० रुपये मजुरी करणाऱ्या व्यक्तीला पडत आहे. एका गॅस सिलिंडरसाठी ९०० रुपये माेजावे लागत असल्यामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे.
( काेट)
शहरातही पेटत आहेत चुली
दिवसाला १०० ते १५० रुपये कमाविणाऱ्या कुटुंबाला ९०० रुपये देऊन गॅस भरणे अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे शहरातीलही नागरिकांना आता पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे. शहरात चुलीत जाळण्यासाठी काड्याही मिळत नाही. जंगलात गेल्यास वाघाची भीती आहे. स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न आहे.
- शेवंता चिलबुले, गृहिणी
(काेट)
केंद्र शासनाने माेठा गाजावाजा करून उज्ज्वला याेजना राबविली. प्रत्येकाला गॅस सिलिंडर दिले. महिलांचे आजार कमी करण्याचा उद्देश हाेता. मात्र एकीकडे सिलिंडरचा हंडा द्यायचा आणि दुसरीकडे भरमसाट भाव वाढवायचे याला काही अर्थ आहे का? यापेक्षा तर आमच्या जुन्या चुलीच बऱ्या आहे.
-गिरजाबाई धाेटे, गृहिणी
बाॅक्स
महिनानिहाय दर
महिना दर सबसिडी
जुलै २०२० ५९५ ४०
ऑगस्ट २०२० ५९५ ४०
सप्टेंबर २०२० ६५० ४०
ऑक्टाेबर २०२० ६५० ४०
नाेव्हेंबर २०२० ६५० ४०
डिसेंबर २०२० ७५० ४०
जानेवारी २०२१ ७५० ४०
फेब्रुवारी २०२१ ८५३ ४०
मार्च २०२१ ८४६ ४०
एप्रिल २०२१ ८४६ ४०
मे २०२१ ८६५ ४०
जून २०२१ ८६५ ४०
जुलै २०२१ ८९१ ४०