इंदाराम येथे आदिवासी उत्सव समितीची जागा उपलब्ध असल्याने सदर जागेवर सांस्कृतिक समाजभवन उभारून दिल्यास समाजाचे कार्यक्रम घेणे सोयीचे होईल व समाजाच्या सांस्कृतिक विकासालाही चालना मिळेल. त्यामुळे गावातील नागरिकांकडून मागणी केली जात हाेती. नागरिकांनी जि.प. अध्यक्षांना निवेदनही दिले हाेते. या मागणीची दखल घेत कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेच्या १३ वने निधीअंतर्गत १५ लाख रुपये मंजूर केले. सदर समाजभवनाचे भूमिपूजन जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि. प. सदस्य अजय नैताम, सरपंच वर्षा पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, मुसली तलांडे, बुधाजी सोयाम, बापू सिडाम, अर्जुन सोयाम, दिलीप मडावी, रमेश आत्राम, चंद्रशेखर कोरेत, साई कोरेत, रंगू कनाके, नामदेव तलांडे, मधुकर मडावी, उमेश कोरेत, सुगंधा मडावी, सोनी सोयाम, सावित्री वेलादी, निर्मला कोरेत, अनिल तलांडे, तेजराव दुर्गे, संतोष कोडापे, प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक उपस्थित होते.
===Photopath===
260521\26gad_1_26052021_30.jpg
===Caption===
गाेटूल बांधकामाचे भूमिपूजन करताना जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार.