गडचिरोली जि.प.ला २.८६ कोटीने गंडा घालणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 07:56 PM2020-08-06T19:56:41+5:302020-08-06T19:59:46+5:30

गडचिरोली जिल्हा परिषदेला २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपयांनी गंडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अखेर यश आले.

Gadchiroli ZP arrested gang for embezzling Rs 2.86 crore | गडचिरोली जि.प.ला २.८६ कोटीने गंडा घालणाऱ्यांना अटक

गडचिरोली जि.प.ला २.८६ कोटीने गंडा घालणाऱ्यांना अटक

Next
ठळक मुद्देबनावट धनादेश प्रकणाचा छडा मध्यप्रदेशसह नागपूर, भंडारा जिल्ह्यातील आरोपी ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बनावट धनादेशावर बनावट स्वाक्षरी आणि आरटीजीएसकरिता बनावट पत्रही तयार करून गडचिरोली जिल्हा परिषदेला २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपयांनी गंडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अखेर यश आले. वर्षभरापूर्वीपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. एकूण ६ आरोपींना विविध ठिकाणावरून अटक करण्यात आली.

आरोपींमध्ये स्रेहदीप श्रीराम सोनी (४७) रा.नंदनवन नागपूर, किशोरीलाल हिरालाल डहरवाल (५१) रा.रेड्डी, ता.कुरई, जि.शिवणी (मध्यप्रदेश), सुदीप श्रीराम सोनी (५१) रा.नाईक रोड, महाल नागपूर, अमित मनोहर अग्निहोत्री (३५) रा.धनगवळी नगर, हुडकेश्वर नागपूर, अतुल देवीदास डुकरे (४२) रा.आशीर्वाद नगर नागपूर आणि विनोद मंगलसिंग प्रधान (४७) रा.करडी, ता.मोहाडी जि.भंडारा अशा ६ जणांचा समावेश आहे. वेगवेगळी पथके तयार करून त्यांना एकाचवेळी दि.५ ला ताब्यात घेऊन गडचिरोलीत आणण्यात आले. गुरूवारी (दि.६) त्यांना न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणात त्यांना मदत करणाऱ्या इतर आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

या प्रकरणात जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी भुमेश दमाहे यांनी १९ सप्टेंबर २०१९ रोजी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांनी हे प्रकरण तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. या शाखेचे निरीक्षक उल्हास भुसारी यांनी वर्षभराच्या मेहनतीनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले.

पाच खात्यांमध्ये वळती केली रक्कम
सदर टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे जिल्हा परिषदेची रक्कम वेगवेगळ्या नावांच्या पाच खात्यांमध्ये वळती केली. त्यात रामदूत कन्स्ट्रक्शन कंपनी, निर्वाणा बिल्डर्स, चिरंजीवी ट्रेडलिंक, उत्कर्ष निर्माण कंपनी आणि पवनसूत कन्स्ट्रक्शन कंपनी यांचा समावेश आहे.

अनेक प्रकरणे पुढे येणार
या आरोपींचा सुगावा आधीच लागला होता. पण त्यांच्या टोळीतील इतर सदस्यांनाही एकाचवेळी ताब्यात घेणे गरजेचे होते, त्यामुळे थोडा वेळ लागला. या टोळीने अशा पद्धतीने इतरही ठिकाणी गंडा घातला असण्याची दाट शक्यता आहे. त्या सर्व प्रकरणांचा छडा आता लागेल, असा विश्वास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उल्हास भुसारी यांनी व्यक्त केला.

Web Title: Gadchiroli ZP arrested gang for embezzling Rs 2.86 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.