Gadchiroli: युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन
By दिगांबर जवादे | Updated: August 17, 2023 22:30 IST2023-08-17T22:30:11+5:302023-08-17T22:30:37+5:30
Gadchiroli: घरी कोणीही हजर नसताना स्वतःच्या घरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आरमाेरी तालुक्यातील वैरागड येथे घडली.

Gadchiroli: युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन
- दिगांबर जवादे
गडचिराेली : घरी कोणीही हजर नसताना स्वतःच्या घरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आरमाेरी तालुक्यातील वैरागड येथे घडली.
संदीप काशीनाथ कांबळे (३२, रा. वैरागड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो अविवाहित होता. गुरुवारी त्याची आई धान पिकातील निंदण काढण्यासाठी शेतावर गेली हाेती. घरी कोणीही हजर नसताना संदीपने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती आरमाेरी पाेलिसांना दिली. पाेलिसांनी घर गाठून पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.