गडचिरोलीत गावकऱ्यांनी पकडला तब्बल १५०० किलो मोहसडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 17:44 IST2020-04-21T17:41:57+5:302020-04-21T17:44:27+5:30
सर्वत्र लोकडाऊन असतानाही दारू गाळणाऱ्या पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा १५ क्विंटल म्हणजेच १५०० किलो मोहसडवा पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गावसंघटनांनी पकडून नष्ट केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

गडचिरोलीत गावकऱ्यांनी पकडला तब्बल १५०० किलो मोहसडवा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्वत्र लोकडाऊन असतानाही दारू गाळणाऱ्या पोटगाव आणि विसोरा येथील हातभट्टीचालकांचा १५ क्विंटल म्हणजेच १५०० किलो मोहसडवा पोलीस पाटील आणि मुक्तिपथ गावसंघटनांनी पकडून नष्ट केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली.
पोटगाव येथे गोपाळक वस्तीत एक महिला घरीच दारू गाळून त्याची विक्र करीत असल्याची माहिती गाव संघटनेला मिळाली. त्यांनी मुक्तिपथ चमुला याची माहिती दिली. गाव संघटनेच्या महिला, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, सरपंच यांच्या मदतीने धाड टाकली असता घरी दारू विकली जात असल्याने निदर्शनास आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गावातील युवकही गस्तीवर आहेत. हा प्रकार लक्षात येताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मिळून परिसर पिंजून काढला असता प्लास्टिक पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ५०० किलो मोहसडवा सापडला.
त्याचबरोबर दारू गाळण्याचे साहित्यही सापडले. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत तो नष्ट करण्यात आला. दुसरी कारवाई विसोला येथे युवकांच्या पुढाकाराने करण्यात आली.