शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली एसटी विभाग मालामाल

By admin | Updated: March 8, 2017 02:08 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव व आष्टी परिसरातील चपराळा तसेच व्यंकटापूर येथे

मार्कंडा, चपराळा यात्रेतून २३ लाख ३७ हजार रूपयांचे उत्पन्न दिलीप दहेलकर   गडचिरोली विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव व आष्टी परिसरातील चपराळा तसेच व्यंकटापूर येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेदरम्यान भाविकांसाठी गडचिरोली एसटी विभागामार्फत एकूण ५८ बसगाड्या यात्रा स्पेशल म्हणून सोडण्यात आल्या होत्या. या बसगाड्याच्या माध्यमातून गडचिरोलीच्या एसटी विभागाला एकूण २३ लाख ३७ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मार्कंडादेव यात्रेदरम्यान भाविकांची वाहतुक सुविधेसाठी गैरसोय होऊ नये, या उद्देशाने एसटीचे विभाग नियंत्रक व्ही. टी. गव्हाळे यांच्या मार्गदर्शनात विभागीय वाहतूक अधिकारी एन. एस. बेलसरे, गडचिरोली आगार व्यवस्थापक व्ही. एल. बावणे, बसस्थानक प्रमुख पी. एस. सालोटकर, एस. ए. चौधरी यांनी या स्पेशल बसफेऱ्यांचे नियोजन केले. याशिवाय गडचिरोली आगारातर्फे मार्र्कंडादेव व साखरी घाट येथे तात्पुरते बसस्थानकही उभारण्यात आले होते. मार्र्कंडा व चपराळा यात्रेसाठी गडचिरोली आगाराच्या ३१, अहेरी आगारातर्फे १२ व ब्रह्मपुरी आगारातर्फे १५ अशा एकूण ५८ बसगाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय कार्यालयामार्फत सोडण्यात आल्या. या ५८ बसगाड्यांच्या २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत अनेक बसफेऱ्या यात्रेकरूंसाठी सोडण्यात आल्या. यात्रा स्पेशलमधून अहेरी आगाराला ४ लाख ९९ हजार ५०१ रूपये, गडचिरोली आगाराला १६ लाख ४२ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तसेच ब्रह्मपुरी आगाराला ६ लाख ९४ हजार ४८९ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यात्रा स्पेशल बसफेऱ्यांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी एसटीच्या विभागीय कार्यालयातर्फे मार्र्कंडादेव येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा नेहमी तोट्यात राहत असते. मात्र महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी भरणाऱ्या जत्रा तसेच जि. प., प.स व अन्य निवडणुकांच्या माध्यमातून निवडणूक व पोलीस विभागातर्फे लाखो रूपयांचे उत्पन्न एसटीला मिळत असते. त्यामुळे तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला अशा स्पेशल बसफेऱ्यांमधून आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळतो. विशेष म्हणजे, महाशिवरात्री यात्रा व निवडणूक काळात बसफेऱ्यांवर परिणाम होऊ नये, याकरिता चालक व वाहकांच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या. जि. प. निवडणुकीतून अहेरी आगारालाही सात लाखांचे उत्पन्न दुसऱ्या टप्प्यात अहेरी उपविभागातील चार तालुक्यात जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या कामासाठी अहेरीच्या तहसील कार्यालयाने अहेरी आगाराच्या २४ व पोलीस प्रशासनाने पाच अशा एकूण २९ बसगाड्या अधिग्रहीत केल्या होत्या. या बसगाड्याच्या माध्यमातून अहेरी आगाराला ७ लाख ७० हजार ९०५ रूपये इतके उत्पन्न प्राप्त होणार असल्याची माहिती अहेरीचे आगार व्यवस्थापक घागरगुंडे यांनी दिली आहे. जि.प. निवडणुकीतून ३२ लाख मिळाले नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता पोलिंग पाट्या व पोलीस जवानांना मतदान केंद्रस्थळी नेण्याकरिता गडचिरोली आगाराच्या १०४ बसगाड्या अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. देसाईगंज, आरमोरी, धानोरा, कुरखेडा, चामोर्शी व सावली या सहा तहसील कार्यालय प्रशासनातर्फे गडचिरोली आगाराच्या एकूण ८० बसगाड्या अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस विभागाने गडचिरोली आगाराच्या २४ बसगाड्या अधिग्रहीत केल्या होत्या. दोन्ही विभागाच्या बसगाडया मिळून एकूण ३२ लाख रूपयांचे उत्पन्न गडचिरोली एसटी आगाराला प्राप्त झाले आहे. ५३ हजार किमी अंतर बसगाड्या धावल्या राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय गडचिरोलीच्या वतीने अहेरी, ब्रह्मपुरी व गडचिरोली आगाराच्या मिळून एकुण ५८ बसगाड्या मार्र्कंडा व चपराळा यात्रा स्पेशल म्हणून लावण्यात आल्या होत्या. सदर बसगाड्या यात्रेदरम्यान एकूण ५३ हजार ८२४ किमी अंतर विविध मार्गावर धावल्या.