गडचिरोलीत ३० होर्डिंग्ज काढले

By Admin | Updated: November 29, 2014 01:16 IST2014-11-29T01:16:19+5:302014-11-29T01:16:19+5:30

नगर पालिका, महानगर पालिकेच्या क्षेत्रात होर्डिंग्ज आढळल्यास अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर बरखास्तीची कारवाई केली जाईल, असे आदेश उच्च न्यायालयाने जारी केले होते.

Gadchiroli removed 30 hoardings | गडचिरोलीत ३० होर्डिंग्ज काढले

गडचिरोलीत ३० होर्डिंग्ज काढले

गडचिरोली : नगर पालिका, महानगर पालिकेच्या क्षेत्रात होर्डिंग्ज आढळल्यास अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर बरखास्तीची कारवाई केली जाईल, असे आदेश उच्च न्यायालयाने जारी केले होते. त्यानंतरही गडचिरोली नगर पालिकेच्या क्षेत्रात होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करण्यात आली नव्हती. याबाबत २८ नोव्हेंबरला लोकमतने वृत्त प्रकाशित करताच गडचिरोली नगर पालिकेचे प्रशासन खळबळून जागे झाले व आज शुक्रवारला एकाच दिवशी शहरात ३० होर्डिंग्ज काढण्याची कारवाई पार पाडण्यात आली, अशी माहिती नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. शहरात कॉम्प्लेक्स ते लांजेडा व आरमोरी रोड ते चामोर्शी रोड या मार्गावर विविध होर्डिंग्ज लावण्यात आले होते. आज मोहिमेदरम्यान नगर पालिका प्रशासनाचे ट्रॅक्टर, मजूर आदी मोठा लवाजमा कामात लागला होता. सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती. या मोहिमेंतर्गत एकाच दिवशी ३० होर्डिंग्ज काढून नगर पालिकेच्या आवारात जमा करण्यात आले आहे. यात बहुतांशी होर्डिंग्ज हे राजकीय आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही होर्डिंग्जचे हे लोण पसरलेले आहे. ग्रामपंचायतींची परवानगी न घेताही होर्डिंग्ज लावले जात आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर ग्रामीण भागात मात्र कुठेही होर्डिंग्ज काढल्याची कारवाई झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे ग्रामीण भागात होर्डिंग्ज लावणाऱ्यांची अद्यापही धूमच आहे. नाटकांचे शेकडो होर्डिंग्ज लागून आहे.

Web Title: Gadchiroli removed 30 hoardings