Gadchiroli: नक्षलवादी शेतात आले धाड-धाड गोळ्या झाडून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 08:11 IST2023-11-26T08:11:36+5:302023-11-26T08:11:58+5:30

Gadchiroli: पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. कापेवंचा (ता. अहेरी) येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

Gadchiroli: Naxalites came to the farm and fired shots | Gadchiroli: नक्षलवादी शेतात आले धाड-धाड गोळ्या झाडून गेले

Gadchiroli: नक्षलवादी शेतात आले धाड-धाड गोळ्या झाडून गेले

गडचिरोली - पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. कापेवंचा (ता. अहेरी) येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. रामजी आत्राम (वय २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी आढळलेल्या नक्षल पत्रकात तो खबऱ्या असल्याचा दावा केला आहे.  महिनाभरात नक्षल्यांनी तिघांना बंदुकीचा निशाणा बनविले आहे. 

रामजी हा  शेतात काम करीत होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास काही सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्या ठिकाणी जाऊन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. 
महिनाभरात तीन हत्या   
१५ नोव्हेंबर : दिनेश गावडे, (पेनगुंडा, ता. भामरागड)
२३ नोव्हेंबर : पोलिस पाटील लालसू वेडदा, (टिटोळा, ता. एटापल्ली)    
२४ नोव्हेंबर : रामजी आत्राम, (कापेवंचा, ता. अहेरी) 

Web Title: Gadchiroli: Naxalites came to the farm and fired shots