शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

Gadchiroli Naxal attack: ...तर वाचले असते पोलिसांचे प्राण, आततायीपणा नडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 8:30 PM

कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले.

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिका-यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस दलाकडे ३४ भूसुरूंग रोधक वाहने असताना ‘क्युआरटी’च्या (शिघ्र प्रतिसाद पथक) १५ जवानांसाठी त्यापैकी एकही वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. हे वाहन असते तर भूसुरूंग स्फोटाची झळ कमी होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हाणी टाळणे शक्य झाले असते, असा कयास लावल्या जात आहे.

जिल्हा पोलीस दलाकडे नक्षलविरोधी अभियानासाठी २००७ मध्ये काही भूसुरूंग रोधक वाहने आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अशी एकूण ३४ वाहने गडचिरोली पोलिसांना मिळाली आहेत. जिल्ह्यात १० उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या नियंत्रणाखाली १० क्युआरटी पथक आहेत. नक्षलविरोधी मोहिमेत तातडीने कुठेही जाण्यासाठी या पथकाला नेहमी सज्ज असावे लागते. त्यामुळे या पथकांसाठी १० भूसुरूंग रोधक वाहने असणे आवश्यक असताना त्या दिवशी कुरखेडा येथे हे वाहन नव्हते. परिणामी अधिका-यांच्या आदेशानुसार या पथकाला तातडीने खासगी वाहनातून नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली त्या दादापूरकडे निघावे लागले. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी घात केला.

वास्तविक त्यांच्यासाठी भूसुरूंग रोधक वाहन उपलब्ध असते आणि त्यातून हे जवान गेले असते तर स्फोटाची झळ कमी प्रमाणात जाणवून एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हाणी टाळणे शक्य झाले असते.

भूसुरूंग रोधक वाहनांची क्षमता काय?नक्षलवाद्यांनी गेल्या १२ वर्षात ३ वेळा भुसूरूंग रोधक वाहने स्फोटात उडविली आहेत. त्यात झालेली वाहनांची हाणी पाहता या वाहनांची खरोखरच किती स्फोटक सहन करण्याची क्षमता आहे याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. मे २०१७ मध्ये भामरागड-कोटी मार्गावर घडवून आणलेल्या स्फोटात भूसुरूंग रोधक वाहनाचे मोठे नुकसान होऊन दोन पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे या वाहनांची स्फोटक सहन करण्याची क्षमता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.खबरीमुळे यशस्वी झाला नक्षलवाद्यांचा डावदादापूरमध्ये रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराची वाहने जाळल्यानंतर पोलीस तिकडे जातील याचा अंदाज घेऊन जांभुळखेडा ते लेंढारीदरम्यानच्या छोट्या पुलाखाली नक्षलवाद्यांनी आधीच भूसुरूंग पेरून ठेवले होते. पण जानेवारी महिन्यातच डांबरीकरणाने गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर भूसुरुंग पेरला असू शकतो याची पुसटशीही कल्पना पोलिसांना आली नाही. त्यामुळे कुरखेडाचे एसडीपीओ यांनी शैलेश काळे यांनी क्युआरटी पथकाला तिकडे बोलविताच हे १५ जवान मागचापुढचा विचार न करता निघाले. पोलीस पथक तिकडे निघाल्याची माहिती कुरखेडा येथूनच खबरीकडून नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे तो खबरी कोण? याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली