In Gadchiroli, eight people died in just six days | गडचिरोलीत अवघ्या सहा दिवसात आठ जणांचा मृत्यू

गडचिरोलीत अवघ्या सहा दिवसात आठ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देकोरोनाचा असाही कहर ८५ नवीन बाधितांची नोंद तर ३६ जण कोरानामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. दि. १८ ते २३ या ६ दिवसात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. यापैकी बहुतांश लोक वेगवेगळ्या आजारांनी पीडित होते. दरम्यान पुन्हा ८५ पॉझिटिव्हची भर पडल्याने एकूण बाधित लोकांची संख्या आता २१७१ झाली आहे.
नवीन ८५ बाधितांमध्ये गडचिरोलीमधील २४ जण आहेत. त्यात नेहरू वॉर्डमधील १, गोगाव १, गडचिरोली ५, जिल्हा परिषदेतील ७ कर्मचारी, एसआरपीएफ १, रामपुरी १, हनुमान वॉर्ड १, कारगिल चौक १, नवेगाव १, नागभीडवरून आलेला १, वनश्री कॉलनी १, नंदनवनघर १, रामनगर १ यांचा समावेश आहे.

एटापल्ली तालुक्यातील ३ जणांमध्ये बुर्गी गावातील १, जारावंडी २ जणांचा समावेश आहे.
कोरचीमध्ये स्थानिक ३ कोरोनाबाधित आढळले. देसाईगंजमध्ये बुधवारी १३ बाधित आढळले. त्यात राजेंद्र वॉर्ड १, सीआरपीएफ २, सावंगी १, कोंढाळा १, कोकडी १, कुरूड २, माता वॉर्ड १, हनुमान वॉर्ड १, आंबेडकर वॉर्ड १, विसोरा १, वडसा १ यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील १२ जणांमध्ये स्थानिक ६ व देऊळगावच्या ६ जणांचा समावेश आहे.
चामोर्शी तालुक्यातील १० जणांमध्ये आष्टी २, चामोर्शी ४, आमगाव २ घारगाव १, डोंगरगाव १ जणाचा समावेश आहे. मुलचेरा सुंदरनगर येथील १ जण बाधित आढळला.
धानोरा तालुक्यातील ४ जणांमध्ये स्थानिक २ व चातगाव २, अहेरी येथील ८ जणांमध्ये महागाव ५, अहेरी शहर २, जिमलगट्टा १ यांचा समावेश आहे. सिरोंचातील ७ जणांमध्ये वॉर्ड नं. ३ मध्ये १, वॉर्ड नं. ७ मध्ये ३, वॉर्ड नं. ६ मध्ये ३ जण बाधित आढळले. तसेच कुरखेडामधील १ जण पॉझिटिव्ह आढळला आहे.

एकूण क्रियाशिल कोरोना बाधितांपैकी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ३६ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये अहेरी २, आरमोरी ५, चामोर्शी ३, धानोरा २, गडचिरोली १९, मुलचेरा १, सिरोंचा ३ व देसाईगंज येथील एका जणाचा समावेश आहे.

पुन्हा वाढली क्रियाशील रुग्णांची संख्या
बुधवारी मृत्यू झालेली व्यक्ती गडचिरोलीच्या विवेकानंदनगरातील ५५ वर्षीय पुरूष आहे. ते हायपर टेन्शन आणि डायबेटिक (मधुमेहग्रस्त) होते. ३६ जण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यातील क्रियाशिल कोरोनाबाधितांची संख्या ५३८ झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधित २१७१ रूग्णांपैकी १६१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: In Gadchiroli, eight people died in just six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.