SSC Result 2020; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ९२.६९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 18:34 IST2020-07-29T18:34:03+5:302020-07-29T18:34:23+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या यावर्षीचा दहावी परीक्षेचा निकाल ९२.६९ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी ३८ टक्क्यांनी सुधारली आहे.

SSC Result 2020; गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ९२.६९ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या यावर्षीचा दहावी परीक्षेचा निकाल ९२.६९ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी ३८ टक्क्यांनी सुधारली आहे. गडचिरोली शहरातील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचा मानस दीपक पाटील याने ९७.८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे. जिल्ह्यातील एकूण १४ हजार १८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.२१ टक्के तर मुलांचे प्रमाण ९१.२८ टक्के आहे. जिल्ह्यातील ८७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.