गडचिरोली जिल्ह्यात दुचाकी पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 08:35 PM2020-11-28T20:35:16+5:302020-11-28T20:35:37+5:30

Gadchiroli News crime news देसाईगंज शहरात घरफोड्या, अवैध धंद्यांना ऊत आले असतांनाच मुख्य बाजारपेठेत दुचाकी पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलेच बदडले.

In Gadchiroli district, a thief trying to hijack a two-wheeler was beaten up by citizens | गडचिरोली जिल्ह्यात दुचाकी पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी बदडले

गडचिरोली जिल्ह्यात दुचाकी पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी बदडले

Next
ठळक मुद्देदेसाईगंज शहराच्या मुख्य बाजारपेठेतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली  : देसाईगंज शहरात घरफोड्या, अवैध धंद्यांना ऊत आले असतांनाच मुख्य बाजारपेठेत दुचाकी पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडून चांगलेच बदडले. दरम्यान घटनास्थळी वेळेवर पोलिस पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार शहरातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरात स्प्लेंडर मोटारसायकल उभी करून एक ग्राहक भाजीपाला घेत असता ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेर/नवरगाव येथील राहुल रामदास ठेंगरे 30, वर्षे हा इसम सदर मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आला. काही नागरिकांना संशय आला असता चौकशी अंती सदर इसम मोटारसायकल चोरीच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होताच नागरिकांनी सदर इसमास चांगलेच धुतले.
दरम्यान घटनास्थळी पोलिस पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेऊन बोलते केले असता मोटारसायकल पळवुन नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट झाल्याने सदर इसमावर भांदविचे कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत.

Web Title: In Gadchiroli district, a thief trying to hijack a two-wheeler was beaten up by citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.