अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : जिल्हाधिकारी या शब्दापेक्षा ‘कलेक्टर’ हा शब्द सर्वसामान्य लोकांच्या अगदी जवळचा आहे. जिल्ह्याचा बॉस म्हणजे जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर हे सर्वसामान्य लोकांना माहीत आहे. आजपासून ३८ वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ जिल्हाधिकाऱ्यांनी सेवा दिली. त्यात ए.डी. काळे यांनी सर्वाधिक काळ म्हणजे १०९९ दिवस तर महेश आव्हाड यांनी केवळ १४ दिवस कलेक्टर म्हणून काम पाहिले.भौगोलिक विस्ताराने मोठा असलेला तेव्हाचा (सन १९८२ पूर्वी) चंद्रपूर जिल्हा हा प्रशासन आणि जनतेच्या सोयीने अत्यंत त्रासदायक आणि न परवडणारा होता. त्यामुळे लोकांकडून आाणि सरकारी पातळीवरसुद्धा जिल्हा विभाजनासाठी जोर सुरू होता. अखेर २६ ऑगस्ट १९८२ या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. नवा जिल्हा अस्तित्वात येताच जिल्हास्तरावरील सर्व पदे तयार झाली. यात जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे सर्वोच्च पद आणि महत्वाचे पद होते. गडचिरोली जिल्ह्याचे प्रथम जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला तो रत्नाकर गायकवाड यांना. पुढे रत्नाकर गायकवाड हे राज्याचे मुख्य सचिवसुद्धा झाले होते, हे विशेष!२६ आॅगस्ट १९८२ पासून आजपर्यंत एकूण २४ आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम पाहिले. सध्या यावर्षीच १८ जानेवारीपासून दीपक सिंगला हे २४ वे जिल्हाधिकारीे म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आधी २३ जिल्हाधिकारी सेवा देऊन गेले. त्यामध्ये पंधरावे जिल्हाधिकारी ए.डी. काळे हे सर्वाधिक काळ म्हणजे १०१९ दिवस (३ वर्षे ४ दिवस) तर २१ वे जिल्हाधिकारी महेश आव्हाड अवघे १४ दिवस पदावर कार्यरत होते.गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या आजपर्यंतच्या एकूण २४ जिल्हाधिकाऱ्यांमध्ये फक्त दोघांनी एक हजार दिवस जिल्हाधिकारी म्हणून सेवा कालावधी पूर्ण केला आहे. त्यात ए.डी. काळे आणि रत्नाकर गायकवाड यांचा समावेश आहे. पहिले जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड हे १००१ दिवस आणि विसावे जिल्हाधिकारी रणजित कुमार हे ९६३ दिवस कार्यरत होते. तसेच तेरावे जिल्हाधिकारी आर.ए. राजीव यांचा कार्यकाळ अवघ्या ४२ दिवसांचा होता.अजूनही लाभल्या नाहीत महिला कलेक्टरराज्यातील ३१ वा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. बुधवारी गडचिरोली जिल्हा स्थापनेला ३८ वर्षे पूर्ण झालीत. या ३८ वर्षांत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून २४ आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी प्रशासीय धुरा सांभाळली. मात्र त्यामध्ये एकाही महिला अधिकाऱ्यांचा समावेश नाही. एकूणच जिल्ह्याला अजूनही महिला कलेक्टरची सेवा लाभण्यासाठी वाट पहावी लागेल.गडचिरोली जिल्ह्यातून शासनाच्या सेवेत अनेक अधिकारी होऊन गेले. पण जिल्हाधिकारी बनून कोणी आजपर्यंत या जिल्ह्यातील व्यक्ती लाभली नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया युवा वर्गातून भविष्यात कोणीतरी आयएएस होऊन आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून रूजू झाल्याचे पाहण्याचे भाग्य येथील नागरिकांना कधी लाभेल, याची प्रतीक्षा सर्वांना आहे.
३८ वर्षांत गडचिरोली जिल्ह्याला लाभले २४ ‘कलेक्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:01 IST
भौगोलिक विस्ताराने मोठा असलेला तेव्हाचा (सन १९८२ पूर्वी) चंद्रपूर जिल्हा हा प्रशासन आणि जनतेच्या सोयीने अत्यंत त्रासदायक आणि न परवडणारा होता. त्यामुळे लोकांकडून आाणि सरकारी पातळीवरसुद्धा जिल्हा विभाजनासाठी जोर सुरू होता. अखेर २६ ऑगस्ट १९८२ या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. नवा जिल्हा अस्तित्वात येताच जिल्हास्तरावरील सर्व पदे तयार झाली.
३८ वर्षांत गडचिरोली जिल्ह्याला लाभले २४ ‘कलेक्टर’
ठळक मुद्देरत्नाकर गायकवाड पहिले जिल्हाधिकारी : ए.डी. काळे यांनी दिली सर्वाधिक काळ सेवा