गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:48 IST2020-09-13T12:48:11+5:302020-09-13T12:48:31+5:30
जिल्हाधिकारी दीपक सिंगला वैयक्तिक कारणासाठी 10 दिवस रजेवर होते. शनिवारी ते जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर संध्याकाळी त्यांची रॅपिड कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह निघाली.

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना कोरोनाची लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाधिकारी दीपक सिंगला वैयक्तिक कारणासाठी 10 दिवस रजेवर होते. शनिवारी ते जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर संध्याकाळी त्यांची रॅपिड कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह निघाली.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांचा कोरोना लक्षणेविरहित आहे. उपचारादरम्यान जिल्ह्यातील प्रशासकिय काम आॅनलाइन स्वरूपात सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.