गडचिराेलीत तीन वर्षानंतर हाेणार 416 पाेलिसांची भरती; तरूणांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST2022-03-23T05:00:00+5:302022-03-23T05:00:31+5:30
गडचिराेली जिल्ह्यातील पाेलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती. आता सामान्य प्रशासन विभागाने बिंदुनामावली तयार केली आहे. त्यामुळे पाेलिसांची भरती करण्यातील अडथळा दूर झाला असल्याने भरती प्रक्रिया तातडीने राबविली जाणार आहे. मागील तीन वर्षांपासून पाेलीस भरती झाली नसल्याने जिल्ह्यातील अनेक युवक पाेलीस भरतीची प्रतीक्षा करीत आहेत.

गडचिराेलीत तीन वर्षानंतर हाेणार 416 पाेलिसांची भरती; तरूणांना दिलासा
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : ३१ डिसेंबर २०२० अखेरपर्यंत गडचिराेली पाेलीस दलात १५० पाेलीस शिपाई, १६१ पाेलीस शिपाई चालक व देसाईगंज एसआरपीएफ गट क्रमांक १३ मधील १०५ पदे अशी एकूण ४१६ पदे भरली जाणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
गडचिराेली जिल्ह्यातील पाेलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती. आता सामान्य प्रशासन विभागाने बिंदुनामावली तयार केली आहे. त्यामुळे पाेलिसांची भरती करण्यातील अडथळा दूर झाला असल्याने भरती प्रक्रिया तातडीने राबविली जाणार आहे.
मागील तीन वर्षांपासून पाेलीस भरती झाली नसल्याने जिल्ह्यातील अनेक युवक पाेलीस भरतीची प्रतीक्षा करीत आहेत.
पाेलीस भरती निघेल या आशेवर अनेक जण तयारीसुद्धा करीत हाेते. मात्र भरती हाेत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली हाेती. मात्र नवीन शासन निर्णयामुळे युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
भरतीचे अधिकार कंपनीला नाही
- पाेलीस भरती राबविण्याची जबाबदारी शासनाने टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएल यांच्याकडे साेपविली हाेती. मात्र गडचिराेली जिल्ह्यातील पाेलीस भरती यातून वगळण्यात आली आहे. या जिल्ह्यातील पाेलीस भरती थेट पाेलीस विभाग घेणार आहे.
- आजपर्यंतच्या सर्वच पाेलीस भरती पाेलीस विभागानेच घेतल्या आहेत. येथील परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळी आहे. नक्षलवादाचा सामना करण्यासाठी स्थानिक युवकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळेच शासनाने पाेलीस भरतीचे अधिकार खासगी कंपन्यांकडून काढून पाेलीस विभागाला दिले असल्याचा अंदाज आहे.