सव्वा लाख रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:38 IST2021-04-04T04:38:17+5:302021-04-04T04:38:17+5:30
बाॅक्स ६ लाख ५० हजारांचा माेहफुल सडवा जप्त चांदाळा गावापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या नाल्यात माेहफुलाचा सडवा लपवून ठेवला ...

सव्वा लाख रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त
बाॅक्स
६ लाख ५० हजारांचा माेहफुल सडवा जप्त
चांदाळा गावापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या नाल्यात माेहफुलाचा सडवा लपवून ठेवला असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या ठिकाणावरून ४० ड्रम माेहफुलाचा सडवा............. जप्त केला आहे. याची किंमत २ लाख रुपये एवढी हाेते. तसेच प्लास्टिक ड्रम व केतल्यांची किमत २२ हजार रुपये असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रमेश गाेरे (रा. चांदाळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस उपनिरीक्षक हाेमकांत म्हशाखेत्री, सुनील बेसरकर, दिनकर मेश्राम यांनी केली.
मुरूमबाेडी येथून ९० मडक्यांमध्ये लपवून ठेवलेला ४ लाख ५० हजार रुपयांचा माेहसडवा जप्त केला आहे. सतीश गाेमाजी वट्टी, रूपेश वासुदेव आतला, दामाेधर तुकाराम कुमरे (तिघेही रा. मुरूमबाेडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस उपनिरीक्षक प्रभाकर भेंडारे, अशाेक कुमरे, शकिल सय्यद, शीला कुकुडकर, प्रमाेद वाळके यांनी केली.
गडचिराेली शहरातील मंगला गणेश पिपरे हिच्या घरून १८ हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक शरद मेश्राम, पाेलीस हवालदार गणेश कांबळे, भास्कर ठाकरे, अंजली शेडमाके, प्रशांत येवतकर, रमेश काेमिरे, राजकुमार गलगट यांच्या पथकाने केली.