लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : आरमोरी विधानसभा मतदार संघातीतल चारही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत व लाभ मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.आमदार कृष्ण गजबे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांना शेतकºयांच्या परिस्थितीची माहिती दिली होती. यावर्षी या भागात पावसाचे प्रमाण कमी आणि अनियमित झाले. त्यातच भारनियमनामुळे अनेक शेतकºयांना योग्य वेळी पिकांना पाणी देता आले नाही. त्यानंतर उष्ण व दमट वातावरणाने तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव होऊन धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा आणि कोरची या चारही तालुक्यांना दुष्काळसदृश परिस्थितीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नव्हते. ही बाब आ.गजबे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या अपर मुख्य सचिवांना निर्देश देऊन यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले.यामुळे हे तालुके लवकरच दृष्काळग्रस्त घोषित होऊन या तालुक्यातील शेतकºयांना शासनाच्या निकषाप्रमाणे योग्य ते लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
चार तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:09 IST
आरमोरी विधानसभा मतदार संघातीतल चारही तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या तालुक्यांतील शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत व लाभ मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.
चार तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्तांच्या यादीत होणार
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच : आमदारांचे प्रयत्न फळाला