वैरागडजवळील अपघातात चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:35 IST2021-05-17T04:35:31+5:302021-05-17T04:35:31+5:30
जितेंद्र जीवन तागडे (३६), अर्जुन कलिये (५०), राहुल साखरे (२९), सिद्धार्थ साखरे (३२, सर्व रा. व्याहाड, ता. ...

वैरागडजवळील अपघातात चार जखमी
जितेंद्र जीवन तागडे (३६), अर्जुन कलिये (५०), राहुल साखरे (२९), सिद्धार्थ साखरे (३२, सर्व रा. व्याहाड, ता. सावली) येथील रहिवासी आहेत. हे सर्व आरमोरी येथे एमएच २१४९ क्रमांकाच्या चारचाकी स्काॅर्पिओ वाहनाने काही कामानिमित्त आले होते. यातील चालक जितेंद्र तागडे हा मूळचा वैरागडचा असल्याने तो आई-वडिलांना भेटण्यासाठी वैरागड येथे आला होता. तेथून व्याहाडकडे परत जात हाेते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वैरागड येथे रांगी टी-पाॅईंटजवळील महसूल मंडल कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला स्काॅर्पिओ धडकली. वाहन चालक जितेंद्र तागडे हा गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे भरती केले आहे. बाकी किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.